घरताज्या घडामोडीसावरपाड्यात वाहून गेलेला पूल तातडीने बनवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दखल

सावरपाड्यात वाहून गेलेला पूल तातडीने बनवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दखल

Subscribe

नाशिकरोड । त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाड्यातील अरुंद खोल नदीवर बांधलेला पूल पूरात वाहून गेल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाल्याचे वृत झळकताच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी व महसूल विभागाने पाहणी करत प्रशासनाला तातडीने नवीन पूल तयार करुन संपुर्ण गाव समस्यामुक्त करण्याच्या सूचना दिल्याने गावक-यांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्री आमच्या गावी! ठाकरेंनंतर आता एकनाथ शिंदेही जाणार महाराष्ट्र दौऱ्यावर

- Advertisement -

सावरपाडा येथे पिण्याच्या पाणी आणण्यासाठी सागाच्या लाकडी बल्ल्यांवरुन नदी पार करणा-या महिलांसाठी जानेवारी २०२२ मध्ये पूल बनविण्यात आला होता. मात्र, गेल्या महिनाभरापासून या भागात पावसाची संततधार सुरू आहे, यामुळे सर्वत्र नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले आहे, याच काळात सावरपाडा भागात नदीवर बांधलेला पूल वाहून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली असून पुन्हा एकदा महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी नदी पात्रावर बल्ल्यांचा वापर करावा लागत आहे. अत्यंत जीवघेणा प्रकार असून पावसाची रिपरिप सुरू आहे, यामुळे पाय घसरुन अपघाताची शक्यता लक्षात घेता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी शुक्रवारी (दि.२३) शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख योगेश म्हस्के, सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाचे अधिकारी, नायब तहसिलदार, आदींनी सावरपाडा येथे भेट देत पाहणी केली, यावेळी गावाला तातडीने पूल, रस्ते व पिण्याच्या पाणी उपलब्ध करुन देण्याच्या प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – सोनिया गांधींना चौकशीच्या नावाखाली मोदी सरकारकडून नाहक त्रास दिला जातोय, नाना पटोलेंचा हल्लाबोल

सावरपाडा गावातील पूल, रस्ते, पिण्याचे पाणी आदी समस्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून पूल, रस्ते, पाणी आदी आवश्यक कामांना सुरुवात होऊन लवकरच सकारात्मक बदल दिसेल.

– मंगेश चिवटे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी

नदी पात्रात खडक व उतार असल्याने याठिकाणी पाण्याचा प्रवाह अधिक तीव्र असतो, यामुळे येथे भक्कम व उंच पूल बनविणे आवश्यक आहे, नाशिक जिल्ह्यातील अशा प्रकारच्या समस्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
योगेश म्हस्के, उत्तर महाराष्ट्र प्रमुख, शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -