घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री आमच्या गावी! ठाकरेंनंतर आता एकनाथ शिंदेही जाणार महाराष्ट्र दौऱ्यावर

मुख्यमंत्री आमच्या गावी! ठाकरेंनंतर आता एकनाथ शिंदेही जाणार महाराष्ट्र दौऱ्यावर

Subscribe

शिवसेनेला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दौरे सुरू केले असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. ३० आणि ३१ जुलै रोजी ते नाशिक आणि संभाजीनगरचा दौरा करणार आहेत. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी या दौऱ्याविषयी माहिती दिली. आज ते मुंबईत बोलत होते.

आदित्य ठाकरे यांनी नाशिक, संभाजीनगर आणि अहमदनगरचा नुकताच दौरा केला. या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देणार आहेत. मुख्यमंत्री आमच्या गावी या मोहिमेअंतर्गत एकनाथ शिंदे नाशिक आणि औरंगाबादचा दौरा करणार असून ३० जुलैला नाशिक तर ३१ जुलैला संभाजीनगरला ते जाणार आहेत, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.

- Advertisement -


खरी शिवसेना आमचीच

खरी शिवसेना आमची असल्यामुळे बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा जागा निवडून आणून दाखवू. रॅली काढून भावनिक होऊन चालत नाही. गेली दोन अडीच वर्ष आदित्य ठाकरेंना पैठणची बैठक लावा असं सांगितले. परंतु ती बैठकही लावली नाही. सत्ता असताना येऊ शकले नाही आता येऊन काय करणार आहे?, असं प्रश्नचिन्ह संदिपान भुमरेंनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -