घरमहाराष्ट्रराजकीय सूडभावनेनं कारवाई करणं योग्य नाही - एकनाथ शिंदे

राजकीय सूडभावनेनं कारवाई करणं योग्य नाही – एकनाथ शिंदे

Subscribe

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सुरु असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवर भाष्य केलं. राजकीय सूडभावनेनं कारवाई करणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ते नागपूर येथे बोलत होते.

एकनाथ शिंदे नागपूर दौऱ्यावर आहेत. आज ते समृद्धी महामार्गासंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. तत्पूर्वी त्यांना प्रसारमाध्यमांशी विमानतळावर संवाद साधला. शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांनी मातोश्रीला दोन कोटी दिल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. त्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी बोलताना यासंदर्भात माहिती नसल्याचं सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी जे काही सध्याच्या परिस्थितीमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकश्या सुरु आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनी जे खरोखर दोषी असतील, भ्रष्टाचारी असतील त्यांची चौकशी जरुर केली पाहिजे. राजकीय सूड भावनेपोटी अशा प्रकारची कारवाई उचित नाही. लोकशाहीमध्ये हे योग्य नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा मे मध्ये सुरु करणार

एकनाथ शिंदे समृद्धी महामार्गाचा आढावा घेण्यासाठी नागपूरला आहे. त्या ठिकाणी ते जी प्रलंबित कामं आहेत, तसंच युद्धपातळीवर जी काम सुरु आहेत, त्या कामांचा आढावा घेणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसंच, पहिला टप्पा मे मध्ये सुरु करण्याच्या विचारात आहोत, असं देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला कोट्यवधींच्या भेटवस्तू दिल्या

मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांची चौकशी करणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांची माहिती असलेली डायरी सापडली आहे. अधिकार्‍यांना या डायरीत ५० लाख रुपयांचं घड्याळ आणि ‘मातोश्री’ला २ कोटी रुपयांची आणखी भेटवस्तू दिलेल्या नोंदी सापडल्या आहेत. मात्र, यशवंत जाधव यांनी डायरीतील नोंदींमध्ये ‘मातोश्री’ हा आपल्या आईचा उल्लेख असल्याचे म्हटलं आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -