घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावरचं संकट टळलं; ECI ची विधान परिषद निवडणुकीला परवानगी!

उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावरचं संकट टळलं; ECI ची विधान परिषद निवडणुकीला परवानगी!

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावरून सुरू झालेल्या चर्चेवर आता अखेर पडदा पडला आहे. राज्यातील तिन्ही सत्ताधारी पक्ष आणि खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्रांचा विचार करून निवडणूक आयोगाने घेतलेल्या तातडीच्या बैठकीमध्ये राज्यात रिक्त ९ विधानपरिषद जागांसाठी निवडणूक घेण्याची परवानगी दिली आहे. एएनआयने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. याचं सविस्तर वृत्त ‘आपलं महानगर’ने दिलं होतं. ते आता खरं ठरलं असून निवडणूक आयोगाने ही परवानगी दिली आहे. मात्र, ही निवडणूक परवानगी देतानाच कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवरच्या सुरक्षेच्या सर्व उपाययोजना पाळूनच ही निवडणूक घेतली जावी असं निवडणूक आयोगाने बजावल्याचे एएनआयने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. येत्या २१ मे रोजी या निवडणुका मुंबईत घेतल्या जातील, असं निवडणूक आयोगाने जाहीर केल्याचं एएनआयने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

रिक्त झालेल्या ९ जागा

भाजप – ३, राष्ट्रवादी काँग्रेस – ३, काँग्रेस – २, शिवसेना – १

- Advertisement -
निवृत्त झालेले सदस्य – शिवसेना

१. डॉ नीलम गोऱ्हे (उपसभापती, विधान परिषद)

निवृत्त झालेले सदस्य – भाजप

१. श्रीमती स्मिता वाघ, २. अरुण अडसड, ३. पृथ्वीराज देशमुख

निवृत्त झालेले सदस्य – राष्ट्रवादी काँग्रेस

१. हेमंत टकले, २. आनंद ठाकूर, ३. किरण पावसकर

निवृत्त झालेले सदस्य – काँग्रेस

१. हरिभाऊ राठोड, २. चंद्रकांत रघुवंशी (निवडणूक आधी राजीनामा दिला आहे)

पक्षीय बलाबल

भाजप – १०५, शिवसेना – ५६, राष्ट्रवादी काँग्रेस – ५४, काँग्रेस – ४४, बहुजन विकास आघाडी – ३, समाजवादी पार्टी – २, एम आय एम – २, प्रहार जनशक्ती – २, मनसे – १, माकप – १, शेतकरी कामगार पक्ष – १, स्वाभिमानी पक्ष – १, राष्ट्रीय समाज पक्ष – १, जनसुराज्य पक्ष – १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – १, अपक्ष – १३

निवडून येण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक असेल {२८८/(९+१) = २८.८} म्हणजेच २९ मते.


वाचा सविस्तर – राज्यातली राजकीय अस्थिरता संपली; उद्धव ठाकरे ३ आठवड्यात विधान परिषदेवर!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -