घरमहाराष्ट्रआणीबाणी २.० मध्ये आपलं स्वागत; भाजप नेत्याने महाराष्ट्र सदनाबाहेर लावलं पोस्टर

आणीबाणी २.० मध्ये आपलं स्वागत; भाजप नेत्याने महाराष्ट्र सदनाबाहेर लावलं पोस्टर

Subscribe

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्यावरील कारवाईची तुलना भाजपने १९७५ च्या आणीबाणीशी केली आहे. दरम्यान, आता भाजपचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी चक्क दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर राज्यात आणीबाणी २.० चा लागल्याचा दावा करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पोस्टर लावले आहे.

वास्तुविषारद अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्हीच्या स्टूडिओचे इंटिरिअर डिझायनिंगचे काम केले होते. मात्र, काम पूर्ण होऊन देखील पैसे न दिल्याने अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी आत्महत्या केली. च्या आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (५ नोव्हेंबर) ताब्यात घेण्यात आलं. रायगड पोलिसांनी केलेल्या या अटकेवरून भाजपाकडून ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपच्या नेत्यांनी या घटनेची तुलना आणीबाणीशी केली.

- Advertisement -

दरम्यान, राज्यातले भाजपचे नेते टीका करत असताना आता दिल्लीतील भाजपचे नेते जिंदरपाल सिंह बग्गा यांनी थेट महाराष्ट्र सदनाबाहेर पोस्टर लावत महाराष्ट्रात आणीबाणी २.० लागल्याचा दावा केला. हाराष्ट्र सदनाबाहेर लावण्यात आलेल्या या पोस्टरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे फोटो आहेत. “आणीबाणी २.० मध्ये आपले स्वागत आहे,’ असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -