घरताज्या घडामोडीबिहार: भागलपूर येथे १०० प्रवासी असलेली बोट उलटली, ५ जणांचा मृत्यू, अनेक...

बिहार: भागलपूर येथे १०० प्रवासी असलेली बोट उलटली, ५ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

Subscribe

बिहार येथील भागलपुरमध्ये बोट पलटी होऊन ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही लोकं बेपत्ता झाले आहेत. ही घटना नौगछियाच्या करारी किनाऱ्यावर झाली आहे. गंगाच्या उपाधारामध्ये ही बोट पलटली आहे. शेतात काम करणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार, या बोटमध्ये १०० लोक प्रवास करत होते. या घटनास्थळी आता एसडीआरएफची टीम रवाना झाली आहे. आतापर्यंत पाच जणांचा मृतदेह मिळाला असून, १५ लोकांची प्रकृती गंभीर आहे.

माहितीनुसार, गुरुवारी सकाळी तिनटंगाहून दियारासाठी बोट निघाली होती. बोटीत अनेक महिला सामील होत्या. जेव्हा बोट बहियार घाटमध्ये रवाना झाली होती तेव्हा परिस्थिती नीट होती. जशी बोट दर्शनिया धारमध्ये गेली तेव्हा जोरदार आलेल्या भोवऱ्यात बोट अडकल्यामुळे ती पलटी झाली. घटनेच्या वेळी बोटमध्ये १०० लोक प्रवास करत होते.

- Advertisement -

शेतात काम करणाऱ्या लोकांनी काही लोकांचे प्राण वाचवले. ज्यामध्ये १५ जणांची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी स्थानिक प्रशासनाचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तसेच एसडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. आतापर्यंत ५ मृतदेह आढळले असून काही लोकं बेपत्ता झाले आहेत. बोट पलटी झाल्यामुळे सध्या गावात एकच खळबळ उडाली आहे. जखमीवर स्थानिक पीएचसीमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच स्थानिक लोकांच्या मदतीतून लोकांना वाचवले जात आहे.


हेही वाचा – ‘ति’ला अचानक काहीतरी झालं आणि ५ मुलांना छतावरून खाली फेकलं!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -