गोवरला रोखण्यासाठी लसीकरणावर भर; दररोज १५० कॅम्प घेण्याचे आदेश

मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून गेल्या दोन - अडीच महिन्यात ९ निष्पाप मुलांचा बळी या आजाराने घेतला आहे.

मुंबई : मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून गेल्या दोन – अडीच महिन्यात ९ निष्पाप मुलांचा बळी या आजाराने घेतला आहे. त्यामुळे आता ‘गोवर’ मुळे कोविडसारखी भयंकर परिस्थिती ओढविण्यापूर्वी गोवरला रोखण्यासाठी गरोदर महिला व लहान मुलांच्या लसीकरणावर भर देण्याचा आणि त्यासाठी ठिकठिकाणी दररोज किमान १५० कॅम्प आयोजित करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. (emphasis on vaccination to prevent measles Orders to take 150 camps per day)

मुंबईत गेल्या दोन – अडीच महिन्यात ‘गोवर’ आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे आतापर्यंत ९ लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १७६ रुग्णांची नोंद झाली आहे. तर २८६० संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. १३७ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी ७ रुग्ण ऑक्सीजनवर २ रुग्ण व्हेंटिलेटवर आहेत.

‘गोवर’ चा आजार हा लस न घेतलेल्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे ‘गोवर’ला रोखण्यासाठी पालिकेने आता जास्तीत जास्त लसीकरणावर भर देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी ‘गोवर’ चा जास्त प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी व ज्या ठिकाणी ‘गोवर’ लसीकरण झालेले नाही, अशा ठिकाणी मुलांना व गरोदर महिलांना लस देण्यासाठी कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत. आतापर्यंत १५ हजार मुलांना गोवर प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.

‘गोवर’ आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी त्यांच्या कुटुंबातील ९ महिने आणि ५ वर्षे वयोगटातील मुलांना गोवर प्रतिबंधात्मक लस दिली नसल्यास तातडीने द्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.


हेही वाचा – चेन्नईत हत्येनंतर तरुणीच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचार