घरमनोरंजनinternational men's day निमित्त मानसी नाईकची 'ती' पोस्ट चर्चेत

international men’s day निमित्त मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Subscribe

मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक हिने सुद्धा नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

आज १९ नोव्हेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन (international men’s day) साजरा केला जातो. याच दिनानिमित्त चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक हिने सुद्धा नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे मानसी नाईक (manasi naik) सध्या चर्चेत आली आहे.

मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. तिने तिच्या अभिनयासोबतच नृत्याने सुद्धा प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे. नुकतीच मानसीने आंतररराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचे सुंदर फोटोसुद्धा शेअर केले आहेत. यासोबत तिने अप्रत्यक्षरित्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत. पोस्ट शेअर करत मानसी नाईक म्हणाली, ‘मी एका अशा कुटुंबात वाढले आहे, जिथे महिलांनी पुरुषांसोबत मिळून किंवा पुरुषांशिवाय बऱ्याच गोष्टी करून दाखवल्या आहेत. त्यामुळे आता ती क्षमता गमावण्याची भिती नसेल’. अभिनेत्री मानसी नाईकांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

- Advertisement -

 मानसी नाईक ने मराठी चित्रपट सृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच सोबत अनेक कार्यक्रमांमधून मानसीचे नृत्य आणि अदा प्रेक्षकांना पहायला मिळतात. ‘तीन बायका फजिती ऐका’ ‘एकता – एक पॉवर’, ‘कुटुंब’, ‘जबरदस्त’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘ढोलकी’, ‘हू तू तू’, ‘कोकणस्थ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसी नाईकने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत तर तिचे रिक्षावाला हे गाणे सुपरहिट झाले होते.


हे ही वाचा – आयुष्मानच्या ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’मध्ये अक्षय कुमार आणि मलायका अरोराची होणार एन्ट्री

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -