घरमहाराष्ट्रदररोज ६७ लाख रुपये मातोश्रीवर जातात; नाना पटोले यांचा शिवसेनेवर घणाघात

दररोज ६७ लाख रुपये मातोश्रीवर जातात; नाना पटोले यांचा शिवसेनेवर घणाघात

Subscribe

आगमी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आता आरोप प्रत्यारोप होऊ लागले असताना आता काँग्रस नेते नाना पटोले यांनी थेट आता 'मातोश्री'वर आरोप केला आहे.

आगमी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आरोप प्रत्यारोप होऊ लागले असताना आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी थेट आता ‘मातोश्री’वर आरोप केला आहे. शिवसेनेने देखील घोटाळा केल्याचे सांगत मातोश्रीवर रोज ६७ लाख रुपये जातात, असा त्यांनी आरोप केला आहे. अमरावतीमध्ये काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेला सुरुवात झाली. त्यावेळी नाना पटोले यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

नेमका काय केला आहे आरोप 

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अपघात वीमा योजना काढला. यासाठी प्रत्येक तिकिटावर वेगळा एक रुपया प्रवाशांकडून घेतला जातो. दररोज राज्यात ६७ लाख लोक बसने प्रवास करतात. याचा अर्थ असा की दररोज ६७ लाख रुपये मातोश्रीवर जातात’, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांवरही ‘नाना’ बरसले 

नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ‘मुख्यमंत्री कार्यालयातून दर महिन्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ५० कोटी खर्च केला जातो. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर तुम्हाला संघाचेच लोक दिसतील. त्यांना पगारही दिला जातो. जनतेच्या घामातून जो पैसा येतो त्यातून त्यांना पगार दिला जातो’, असे नाना पटोले म्हणाले. त्याचबरोबर ‘चंद्रकांत पाटील यांनी देखील जमीन घोटाळा केला. पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुन्हेगार लोक आहेत. अनिल बोंडे यांनी पीक विम्यामार्फत शेतकऱ्यांचे शेकडो कोटी लाटले आणि अवजारे खरेदीतही मोठा घोटाळा केला. मुख्यमंत्री त्यांना क्लीन चीट देतात. मुख्यमंत्री हल्ली सगळ्यांनाच क्लीन चीट देतात. संभाजी भिडेंनाही त्यांनी क्लीन चीट दिली. भाजपचे बबनराव लोणीकर यांनी चतूर देश कारखाण्याच्या नावावर शेकडो शेतकऱ्यांची जमीन लुबाडली, शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे शेअर्स बुडवेल. सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्षलागवडीच्या नावाने कोट्यावधी रुपयांची लूट केली. टेंडर न काढता शेकडो कोटींचे कंत्राट वाटप केले. शिक्षण विभागाच्या खरेदीत घोटाळा झाला. दिवाकर रावते यांनी शिवशाही बसेस खरेदी आणि एसटी कर्मचारी गणवेश खरेदी घोटाळा केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -