घरताज्या घडामोडीगर्लफ्रेंडवर इम्प्रेशन मारण्यासाठी 'तो' लंपास करायचा महागड्या दुचाक्या

गर्लफ्रेंडवर इम्प्रेशन मारण्यासाठी ‘तो’ लंपास करायचा महागड्या दुचाक्या

Subscribe

गर्लफ्रेंडवर इम्प्रेशन मारण्यासाठी चोरीचा मार्ग पत्कारून त्या चोरट्याने साथीदारांच्या मदतीने तब्बल १७ महागड्या दुचाक्या लंपास केल्याची घटना समोर आली आहे.

गर्लफ्रेंडवर इम्प्रेशन मारण्यासाठी चोरीचा मार्ग पत्कारून त्या चोरट्याने साथीदारांच्या मदतीने तब्बल १७ महागड्या दुचाक्या लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या चोरट्याला त्याच्या साथीदारासह कोनगाव पोलिसांनी शिताफीने सापळा रचून दोघांनाही बेड्या ठोकल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या चोरट्याने भिवंडी परिसरातून चोरी केलेल्या दुचाक्या रातोरात पुणे, सोलापूरसह कर्नाटक राज्यात आपल्या परिचितांना अवघ्या चार ते दहा हजार रुपयात विक्री करीत होता. या पैशातून आपल्या मौज मजेसह मैत्रिणीवर प्रभाव टाकण्यासाठी खर्च केल्याचे पोलीस तपासात समोर आले.

या दुक्कलीकडून कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेल्या सहा व नारपोली येथील एक अशा सात गुन्ह्यांचा शोध लागला असून इतर वाहन चोरी बाबत पोलीस माहिती घेत आहे. या दुक्कलीकडून जप्त केलेल्या १७ दुचाकींमध्ये ८ रॉयल एन्फिल्ड कंपनीच्या बुलेटचा समावेश असून ३ पल्सर, २ पॅशन प्रो, ३ होंडा स्प्लेंडर व १ होंडा शाईन गाड्यांचा समावेश आहे. मसू उर्फ पिंटू राम मोरे (वय, २४ रा. रांजणोली, भिवंडी) हा मूळचा सोलापूर जिल्ह्याचा रहिवाशी आहे. तर प्रदीप हनुमंत क्षेत्री (वय १९, रा. पिंपळघर, भिवंडी) असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दुचाकी चोरी प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, पो.ना. किरण पाटील, गिरीष पवार, संतोष पवार, पो.शी. भागवत दफीफळे, नरेंद्र पाटील, कृष्ण महाले, अविनाश पाटील या पोलीस पथकाला गुप्त माहितीदरा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक मदतीने मुंबई – नाशिक मार्गावरील सरवली येथील बासुरी हॉटेल समोर चोरटा येणार असल्याची माहिती मिळाली होती.

- Advertisement -

त्यानुसार याठिकाणी सापळा लावून मसू उर्फ पिंटू याला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता. त्याने मौज मजा आणि गर्लफ्रेंडला विविध दुचाक्यांवर फेरफटका मारून तिच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी त्याने १७ दुचाक्या चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. तर या चोरट्याचे आणखी २ साथीदारांची नावे पोलीस तपासात समोर आली आहेत. तर कोनगाव पोलिसांनी या दुकलीकडून आतापर्यत १७ दुचाक्या हस्तगत केल्या असून त्यासोबत कोनगाव पोलीस ठाण्यात विविध ठिकाणी बेवारस सोडून दिलेल्या ११ दुचाकी आढळून आलेल्या जप्त केल्या असून त्याद्वारे मौजमजेसाठी दुचाकी फिरवून जेथे पेट्रोल संपेल, तेथे सोडून देण्याच्या पद्धतीने या दुचाक्या आढळून आल्या असून ज्यांच्या दुचाकी चोरीला गेल्या आहेत त्यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात येऊन आपल्या वाहनांची खात्री करावी असे आवाहन भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -