घरताज्या घडामोडीगुंडाचे बादशहा शरद पवार; फडणवीसांकडून 'सामना'चे दाखले

गुंडाचे बादशहा शरद पवार; फडणवीसांकडून ‘सामना’चे दाखले

Subscribe

'महाराष्ट्राचे खरे शत्रू हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत', हे मी नाही तर 'सामना'तून बोले जात असल्याचे दाखले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दाखवण्यात आले.

‘महाराष्ट्राचे खरे शत्रू हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आहेत. पवार हे तर गुंडाचे बादशह आहेत, तसेच महाराष्ट्रातील भष्ट्राचार पवारांनी केला. हे मी नाही तर ‘सामना’च्या वृत्तपत्रातून बोले जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अशा एक नाही तर अनेक टीका या ‘सामना’च्या वृत्तपत्रातून करण्यात आल्या आहेत’, याचे दाखले आजच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दाखवले. त्यामुळे आज देखील विधानभवनात विरोधकांकडून मोठा प्रमाणात गदारोळ करण्यात आला.

पवारांच्या आरोपांचे दाखले रेकोर्डवरुन काढून टाका

विधानभवनात आज तिसऱ्या दिवशी देखील विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘सामना’चे दाखले दाखवत शरद पवारांवर सामनातून केलेल्या टीका दाखवण्यात आल्या. यावर परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी ‘पवारांच्या आरोपांचे दाखले रेकोर्डवरुन काढून टाका. ‘सामना’चा संदर्भ विधानभवनात वाचून दाखवू नये. ‘सामना’ वाचता तुमचे अभिनंदनच करतो. मात्र, हे दाखले वाचून दाखवू नये,’ अशी विनंती धनंजय मुंडे यांनी यावेळी केली.

- Advertisement -

शिवसेनेचा राजकीय यूटर्न

‘शिवसेनेची भूमिका सातत्याने बदलत असल्याचे पाहिले आहे. शिवसेनेकडून वारंवार राजकीय यूटर्न घेतला जातो. त्यामुळे आता ‘सामना’ वाचावा लागतो. राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. मात्र, हे सरकार जनमतांनी आलेले नाही. तर हाराकिरीने आलेले सरकार आहे. या सरकारमध्ये विसंवाद आहे’, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवनात केली.


हेही वाचा – नागपूर आमदार निवासात दारूड्यांचा उच्छाद; आमदाराकडेच मागितले पैसे


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -