घरमहाराष्ट्रपोलीस असल्याचे सांगत जेष्ठाला लुटले

पोलीस असल्याचे सांगत जेष्ठाला लुटले

Subscribe

पोलीस असल्याचे सांगत एका ज्येष्ठ नागरिकाला ६१ हजार ८७२ रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात लुबाडल्याच्या घटनानमध्ये वाढ होत आहे. वेगवेगळी शक्कल लावून लोक फसवत असल्याच्या घटना घडत आहेत. अशीचे एक घटना रत्नागिरीमध्ये घडली आहे. आम्ही पोलीस आहोत असे सांगत दोन पोलिसांनी एका ज्येष्ठ नागरिकाला लुटल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीकडून सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना समोर आली आहे. या दोन भामट्यांनी ६१ हजार ८७२ रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

नेमके काय घडले?

रत्नागिरी येथे एक व्यक्ती मॉर्निंग वॉक करत होते. अनंत खाराम पानगले (६४) असे यांचे नाव असून ते मॉर्निंग वॉक करत होते. त्या दरम्यान दोन व्यक्ती दुजाकीवरुन आले आणि त्यांनी आम्ही पोलीस असल्याचे अनंत पानगले यांना सांगितले. तसेच पुढे दंगल सुरु असून तुमचे दागिने काढून या रुमालात ठेवा असे या दोन तरुणांने अनंत पानगले यांना सांगितले. त्यानुसार अनंत पानगले यांनी घाबरुन आपल्या गळ्यातील चैन आणि अंगठ्या हे दागिने काढून त्यांच्याकडे दिले. या तरुणांने ते त्यांचे दागिने घेऊन त्या रुमालात ठेवून त्या रुमालाला गाठ मारली. त्यादरम्यान अनंत यांची नजर चुकवून अनंत यांच्या हातात पुन्हा रुमाला दिला. त्यानंतर अनंत पानगले रूमाल घेऊन धनलक्ष्मी दुकानात गेले असताना त्यांनी रूमालाची गाठ सोडली तेव्हा आतमध्ये दोन हजार रूपये आणि डायरी असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी रुमालात पैसे आणि डायरी पाहून अनंत पानगले यांना धक्काच बसला. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की ज्या व्यक्तींने आपल्याला पोलीस असल्याचे सांगितले ते पोलीस नसून चोर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेत आपली फसवणूक झाली असल्याचे सांगत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -