घरमहाराष्ट्रपुणेकुटुंबाने मुलीच्या आठवणींचा गोडवा असा जपला, केला अनोखा कार्यक्रम

कुटुंबाने मुलीच्या आठवणींचा गोडवा असा जपला, केला अनोखा कार्यक्रम

Subscribe

अवघ्या १९ व्या वर्षी प्रियम राठी हिने अपघातात जीव गमावल्यानंतर या घटनेमुळे तिच्या कुटूंबियांना धक्का बसला होता. पण या घटनेने खचून गेलेल्या प्रियम हिच्या वडिलांनी तिच्या आठवणी जपण्याचा निर्णय घेतला.

मागील वर्षी ९ एप्रिल २०२२ ला पुण्यात राहणाऱ्या राठी कुटूंबातील प्रियम राठीचा मृत्यू झाला. अवघ्या १९ व्या वर्षी प्रियम राठी हिने अपघातात जीव गमावल्यानंतर या घटनेमुळे तिच्या कुटूंबियांना धक्का बसला होता. पण या घटनेने खचून गेलेल्या प्रियम हिच्या वडिलांनी तिच्या आठवणी जपण्याचा निर्णय घेतला. तिच्या आठवणीत प्रथम स्मृतीदिनी पुण्यातील जनता वसाहतीत राहणाऱ्या मुलींना आंबे खाऊ घालण्याचा निर्णय तिच्या कुटूंबाकडून घेण्यात आला. कारण प्रियम हिला आंबे खूप आवडायचे, ज्यामुळे तिला आवडणारी ही गोष्ट राठी कुटूंबियांकडून करण्यात आली.

प्रियम राठी हिचे पुण्यातील गहुंजे स्टेडियमजवळ अपघातात निधन झाले होते. ती राठी कुटूंबातील सर्वात लहान मुलगी असल्याने सगळ्यांची लाडकी होती. पण तिच्या अशा अचानक जाण्याने राठी कुटूंब प्रचंड तणावात होते. त्यामुळे तिची कोणती आठवण जपता येईल, या विचारात असतानाच प्रियमला आंबे आवडत असल्याने मुलींना देखील आंबे खाऊ घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राठी कुटूंबाने प्रियमच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त म्हणजेच रविवारी ९ एप्रिलला पर्वती येथील जनता वसाहतीत राहणाऱ्या मुलींना आंबे खायला देण्याचा उपक्रम राठी कुटूंबाकडून राबविण्यात आला. 

- Advertisement -

‘मनसोक्त आंबे खाऊया’ या कार्यक्रमाचे आयोजन प्रियमच्या मित्रमैत्रिणी व निरामय संस्थेच्या वतीने जनता वसाहत येथील जनता सांस्कृतिक हॉल येथे करण्यात आले होते. यावेळी सुमारे ६० ते ७० मुलींनी आंब्यांचा आस्वाद घेतला. तर प्रियम राठीच्या मित्रमैत्रिणींनी प्रियमच्या आठवणींना देखील यावेळी उजाळा दिला. तर रसरशीत आंब्यांचा आस्वाद घेताना जिभेला सुटलेले पाणी, रसामुळे माखलेले हात, रंगलेले चेहरे आणि हास्यकल्लोळात दंग झालेल्या मुली, असे लोभनीय दृश्य प्रियम राठी हिच्या प्रथम स्मृती दिनी उपस्थितांनी पाहायला मिळाले. यावेळी आंबे खाताना त्या प्रत्येक मुलीत आपली प्रियम असल्याचा भास राठी कुटुंबाला झाला.

” प्रियम मास मीडिया कम्युनिकेशनची विद्यार्थिनी होती, तसेच ती सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सदैव अग्रेसर असे. स्नूकर खेळणे, पर्यटन, साहसी क्रीडा प्रकारात सहभाग, ट्रेकिंग, फोटोग्राफी, मेंडोलीन वाजविणे, ढोल पथक, मॉडलिंग, इत्यादी अनेक उपक्रमात प्रियम, उत्स्फूर्तपणे सहभाग असे. प्रियमला आंबे खाणे आवडायचे. यातूनच तिने भटकंतीची हौस पुरविण्यासाठी ‘प्रियम आम’ या ब्रॅण्ड खाली आंबे विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. मुलींच्या रुपाने जणू प्रियमनेच मनसोक्त आंबे खाण्याचा आनंद लुटल्याचे समाधान लाभले.” अशी भावना प्रियमचे वडील आणि सामाजिक कार्यकर्ते सत्येंद्र राठी यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

अगदी कमी वयात अचानक मृत्यू झाल्यानंतर त्या मुला-मुलींच्या आई-वडिलांना आणि कुटूंबियांना होणारा त्रास हा अत्यंत वेदनादायी असते. त्यामुळे आठवणी जपण्यासाठी विविध पर्याय अवलंबले जातात. पण राठी कुटूंबियांकडून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतूक करण्यात येत आहे.


हेही वाचा – जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी, शेतात काम करताना मजुराचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -