घरताज्या घडामोडीघाटकोपरमधील १० मजली श्रीजी टॉवरला आग; जीवितनाही नाही

घाटकोपरमधील १० मजली श्रीजी टॉवरला आग; जीवितनाही नाही

Subscribe

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ४ बंब आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले.

घाटकोपर पूर्व येथील दहा मजली श्रीजी टॉवर सायंकाळच्या सुमारास आग लागल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ४ बंब आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले.

- Advertisement -

अशी घडली घटना

घाटकोपर पूर्व या ठिकाणी १० मजली श्रीजी टॉवर आहे. सायंकाळी ५.४२ मिनीटांनी या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग लागली. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाचे ४ बंब आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान या इमारतीमध्ये काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. पण सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न करत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -