घरमुंबईउल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर तिघांचा अत्याचार

उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर तिघांचा अत्याचार

Subscribe

आरोपींमध्ये एका शिक्षकाचा समावेश असून या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

एकीकडे महाराष्ट्रात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असताना व महिलांच्या सुरक्षितेबाबत प्रश्न निर्माण झाला असताना उल्हासनगरमध्ये एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीच्या अज्ञातपणाचा फायदा घेत तीन जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेवून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींमध्ये एका शिक्षकाचा समावेश असून या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

अशी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून अक्षय, अजित, चंद्रकांत या तिघांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मुलीच्या अज्ञातपणाचा फायदा घेत वेगवेगळया ठिकाणी तिला नेवून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार त्या पीडित मुलीकडून उघडकीस येताच हिललाईन पोलीस ठाण्यात त्या तिघांविरूद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या तिघांनाही अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हाजर केले असता १९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत. पीडित मुलगी इयत्ता ७वी इयत्तेतील विद्यार्थिनी असून आरोपींमध्ये एका शिक्षकाचा समावेश आहे. यामुळे शहरात संतापाचे वातावरण पसरले आहे. मात्र पोलीस या संदर्भात अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

हेही वाचा – उल्हासनगरमधील भटक्या कुत्र्यांसह मांजरांना ‘पॉज’ने केलं रेबिजमुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -