घरमहाराष्ट्रदारू पिण्यास नकार दिल्यामुळे जवानाला बेदम मारहाण

दारू पिण्यास नकार दिल्यामुळे जवानाला बेदम मारहाण

Subscribe

तोंडात कापडी बोळा टाकून लाकडी आणि लोखंडी रॉडने मारहाण

पिंपरी – दारू पिण्यास नकार दिल्यामुळे जवानाला जबरदस्ती तोंडात दारू ओतून आणि त्याच्या तोंडात कापडी बोळा टाकून लाकडी आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. या घटनेमध्ये एक मेजर आणि तीन जवान सामील होते. ही घटना सोमवारी सायंकाळी औंध येथील लष्करी तळावरील एफटीएन बॅरेक क्रमांक १२ रुममध्ये घडली.

मारहाणीत जखमी असलेल्या जवानाचे नाव रमेश मोहनराव बिष्णोई (वय २६, भोपाळपढ, जोधपूर) आहे. या प्रकरणात मारहाण करणारे मेजर सोहम सिंग बिस्ट, लेफ्टनंट महिपालसिंग खाटी, सुभेदार सुभाष चंद आणि नायब सुभेदार विकास मंडल यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. सांगवी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे म्हणाले की, रमेश यांची पत्नी आमच्याकडे तक्रार देण्यासाठी आली. मग आम्ही सैन्यातील रुग्णालयात गेलो. तिथे आम्ही रमेश यांची तक्रार नोंदवून घेतली.

- Advertisement -

या घटनेच्या दिवशी औंध येथील लष्करी तळावर बॅरेक क्रमांक १२ येथे सर्व आरोपी मद्यप्राशन करत होते. त्यावेळी रमेशला त्या चौघांनी दारू पिण्यास आग्रह केला. रमेशने त्यांना दारू पिण्यास नकार दिला. रमेशने नकार दिल्यामुळे त्याला जबरदस्तीने तोंडात दारू ओतून नंतर त्याच्या तोंडात कापडी गोळा टाकून लाकडी आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. त्याला अशा प्रकारे जखमी केल्याचे रमेशने पोलीसांना सांगितले.

या प्रकरणी भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), ३४२, ३२३, १४३, १४७नुसार गुन्हा दाखल केला गेला. सद्या सांगवी पोलिस आरोपींच्या शोधात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -