घरक्रीडारोहीत शर्माच्या ट्विटला युवराजचं उत्तर!

रोहीत शर्माच्या ट्विटला युवराजचं उत्तर!

Subscribe

रोहीत शर्माच्या ट्वीटला उत्तर देताना युवराज अधीक भावूक झाल्याचं दिसतयं.

भारतीय संघाचा खेळाडू युवराज सिंहने सोमवारी आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ‘एकोणीस वर्षाच्या करिअरची आज समाप्ती झाली आहे’. असे युवराज सिंह पत्रकार परिषेदेत म्हणाला. युवराजला अनेक दिग्गज खेळाडूंनी कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. परंतु रोहीत शर्माच्या ट्वीटला उत्तर देताना युवराज अधिक भावूक झाल्याचं दिसतयं.

भारताचा सलामीवीर बॅट्समन रोहीत शर्मानं युवराजला शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केलं. ट्विट करताना रोहीत म्हणाला की, ‘तू एक उत्कृष्ट खेळाडू आहेस. तुला माहीत नाही की, या दरम्यान तू काय मिळवलं आहेस. लव यू भाई, तूला चांगला निरोप देता आला असता. या ट्विटचे उत्तर देताना युवराज म्हणाला की, ‘तुला माहीत मला किती वेदना होत आहेत ? याची तुला चांगलीच जाणीव आहे. लव यू भाई, यशस्वी हो.’

- Advertisement -

युवराज सिंह पुढे काय करणार ?

सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत युवराज म्हणाला की, जीवनाचा दीर्घकाळ क्रिकेटला दिल्यानंतर तो कर्करोगग्रस्त लोकांना मदतीचा हात देणार आहे. युवराजने ‘यू वी कॅन’ नावाच्या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून कर्करोगग्रस्त लोकांना सहकार्य करायचं त्यानं ठरवलं आहे. युवराजने स्वत: कर्करोगाशी झुंज देत कर्करोगावर मात केली आहे. विश्वचषक २०११ नंतर युवराज सिंहला कर्करोग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर युवराज तब्बल दोन वर्ष कर्करोगाशी लढत होता. कर्करोगातून बाहेर पडल्यानतंर त्यानं ‘यू वी कॅन’ नावाची संस्था काढली होती. कर्करोगग्रस्तांना या संस्थेच्या माध्यमातून मदत मिळवता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -