घरमहाराष्ट्रMIM चे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

MIM चे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी औरंगाबादमधील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगार उपायुक्त कार्यालयात जमलेल्या गर्दी जमली होती. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याने कर्तव्य म्हणून चित्रीकरण करायला सुरुवात केली. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला इम्तियाज जलील यांनी फटका मारला.

औरंगाबादमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याने एका दुकानावर कारवाई करत दुकान सील करण्यात आलं होतं. या दुकानाचं सील काढण्यासाठी इम्तियाज जलील हे व्यापाऱ्यांसोबत कामगार उपायुक्तांच्या कार्यालयात गेले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. त्यावेळी कामगार उपायुक्त कार्यालयातील जमलेल्या जमावाचं कर्तव्य म्हणून महिला कर्मचारी चित्रीकरण करत होत्या. कार्यालयात जमलेल्या गर्दीचं चित्रीकरण महिला पोलीस कर्मचारी करताना इम्तियाज जलील चांगलेच संतापले. “मनोरंजनासाठी चित्रपट पाहायला आलेलो नाही, जमत नसेल तर बाहेर उभे राहा,” अशा शब्दात जलील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सुनावलं. यानंतर मोबाईल खाली पाडण्यासाठी इम्तियाज जलील यांनी त्यांच्या हातावर फटका मारला. महिला कर्मचाऱ्याने घडलेल्या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली.

- Advertisement -

त्यानंतर इम्तियाज जलील यांच्यासह इतर २४ दुकानदारांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. इम्तियाज जलील आणि २४ व्यापाऱ्यांविरोधात आयपीसीच्या कलम ३५३, ३३२, १८८, २६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -