घरताज्या घडामोडीसिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग, पण 'कोविशिल्ड'चं काय?

सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग, पण ‘कोविशिल्ड’चं काय?

Subscribe

सध्या देशात दोन कोरोना लसी देशवासियांना दिल्या जात आहे. एक म्हणजे सिरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशिल्ड’ आणि दुसरी भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’. पण आता ‘कोविशिल्ड’ लस विकसित करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीला आग लागल्याचे समोर आले आहे. दुपारी १च्या सुमारास ही भीषण आग इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे १० बंब दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही आहे. माहितीनुसार, इमारतीत अडकलेल्या ३ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या आगीमुळे ‘कोविशिल्ड’ लस असुरक्षित असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पण ‘कोविशिल्ड’ लस बनवणारा प्लांट हा सुरक्षित आहे.

दिलासादायक बाब म्हणजे ‘कोविशिल्ड’ लसीचे उत्पादन सुरू असलेले हे ठिकाण नसून ते दुसरे ठिकाण आहे. पुणे मांजरी येथील परिसरातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीला आग लागली आहे. तर हडपसर येथे ‘कोविशिल्ड’ लसीचे उत्पादन सुरू आहे. मांजरी येथील या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ‘कोविशिल्ड’ लसीचे उत्पादन सुरू नसून ‘बीसीजी’ लसीचे उत्पादन सुरू आहे. जिथे ‘कोविशिल्ड’ लस तयार होत आहे, त्या ठिकाणापासून मांजरी ठिकाण हे २ ते ३ किलोमीटर अंतरावर आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूमध्ये भीषण आग


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -