घरमहाराष्ट्रपाच कोटींच्या इनपूट क्रेडिटचा लाभ घेणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक, कोठडीत रवानगी

पाच कोटींच्या इनपूट क्रेडिटचा लाभ घेणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक, कोठडीत रवानगी

Subscribe

नवी मुंबईच्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयाने मेसर्स जी एस स्टील या कंपनीच्या एका अधिकृत व्यक्तीला कोणत्याही प्रकारे मालाचा पुरवठा न करता बनावट पावत्यांच्या आधारे ५.१३ कोटी रुपये मूल्याच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडीटचा लाभ घेतल्याबद्दल आणि त्याचा वापर केल्याबद्दल अटक केली आहे. या आरोपीला अटक केल्यावर आज ३० डिसेंबर २०२१ रोजी बेलापूरच्या प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आणि त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

नवी मुंबईच्या सीजीएसटीच्या करचुकवेगिरी प्रतिबंधक पथकाच्या अधिकाऱ्यांनी धातूच्या भंगाराच्या व्यवसायात असलेल्या या कंपनीची चौकशी केल्यावर या कंपनीचे मेसर्स मार्कंडेय ट्रेडर्स, मेसर्स रिगल ऍल्युमिनियम, मेसर्स एम एस स्टील्स, मेसर्स तमन्ना ट्रेडींग कंपनी, मेसर्स युनायटेड ट्रेडर्स, मेसर्स सनराईझ ट्रेडर्स, मेसर्स डिव्हाईन एन्टरप्राईझ आणि इतर सर्व पुरवठादार अस्तित्वात नसल्याचे आणि त्यांच्या नावावर बोगस इनपुट क्रेडीटचा लाभ घेतल्याचे आढळले.

- Advertisement -

सीजीएसटी कायदा २०१७ च्या १३२ कलमान्वये माल किंवा सेवेचा पुरवठा न करता इन्वॉईस किंवा बिल तयार करणे आणि चुकीच्या पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडीटचा लाभ घेणे किंवा वापर करणे हा जर हे व्यवहार पाच कोटी रुपयांच्या वर असतील तर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. आरोपीला सीजीएसटी कायदा २०१७ च्या १३२(१) (क) या कलमाचे उल्लंघन केल्याबद्दल या कायद्याचे कलम ६९ (१) अन्वये अटक करण्यात आली आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -