घरताज्या घडामोडीबँक खात्याचे KYC झाले नाही मग घाबरू नका; १ जानेवारीपासून नवा नियम...

बँक खात्याचे KYC झाले नाही मग घाबरू नका; १ जानेवारीपासून नवा नियम लागू

Subscribe

भारतीय रिझर्व्ह बँकेने बँका आणि अन्य आर्थिक संस्थानांना नियमाप्रमाणे केवायसी अपडेट करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवली आहे.खातेधारकांना RBI ने दिलासा दिला आहे. बँक खाते आणि इतर आर्थिक सेवा १ जानेवारी २०२२ नंतर गोठवले जाणार होते.मात्र RBI ने या केवायसी अपडेटची करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे.गुरुवारी बँकांमध्ये केवायसी अपडेटचा कालावधी तीन महिन्यांनी वाढवला आहे. केंद्रीय बँकेने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेतला आहे.ग्राहकांना या केवायसी अपडेटसाठी बँकेत कागदपत्र घेउन जाण्याची गरज नाही.ग्राहकांना केवायसी अपडेट करायचा असेल तर, त्यासाठी लागणारे डॉक्यूमेंट ई-मेल किंवा पोस्टाने पाठवू शकता.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आणि विविध राज्यांत या पार्श्वभूमीवर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने बँका आणि वित्तीय संस्थांना ग्राहकांविरुद्ध कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले होते.मात्र बँक खातेधारकांनी केवायसी अपडेट केले नाहीतर, भविष्यात खात्यात केल्या जाणाऱ्या व्यवहारांबाबत प्रतिबंध लावला जाऊ शकते.केवायसी हे बँक ग्राहकांची ओळख पटवण्याची एक प्रक्रिया आहे. त्यामुळे कोणत्याही बँकेत अकाउंट उघडण्यासाठी केवायसीची आवश्यकता आहे.

- Advertisement -

‘ही’ कामे ३१ डिसेंबरपूर्वी उरकून घ्या ; नाहीतर भरावा लागेल दंड

  • UAN ला आधारकार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर आहे.कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना सदस्यांना UAN क्रमांक आधारकार्डशी जोडणे अनिवार्य आहे.EPFO मेंबरसाठी हे आधारकार्ड लिंक करणे गरजेचे असून, लिंक न केल्यास तुमचे पीएफ खाते बंद होऊ शकते.
  • जर तुम्ही बॅंक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर, तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत स्वस्त गृहकर्ज घेऊ शकता. बॅंक ऑफ बडोदाने गृहकर्जाचा दर ६.५० टक्क्यांनूी कमी केला असून,हे फक्त ३१ डिसेंबरपर्यंत उपलब्ध असेल.

हे ही वाचा – नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात याचिका करणार – अ‍ॅड. संग्राम देसाई


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -