घरमहाराष्ट्रमासळी, चिकनला महागाईची फोडणी !

मासळी, चिकनला महागाईची फोडणी !

Subscribe

निवडणुकीचा झटका-खवय्यांच्या खिशाला फटका - किलोमागे 30 रूपयांची वाढ

लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढू लागला आसताना मांसाहार विक्रेत्यांनी चिकन-मासळीच्या दरात वाढ करून खवय्यांना चांगलाच घाम फोडला आहे. चिकनचे दर किलोमागे 20 ते 30 रूपयांनी वाढविण्यात आले आहेत. मटणाच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्यातील तापमानात वाढ होत असताना निवडणुकीचे वारेही गरम होऊ लागले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या पंगती वाढल्या असून, त्यांचा मांसाहारावर अधिक भर आहे. वाढलेली मागणी लक्षात घेऊन व्यापार्‍यांनीही संधीचे सोने करण्यासाठी चिकनच्या दरात वाढ केलेली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे मात्र बजेट विस्कळीत झालेले आहे.

- Advertisement -

निवडणुकीच्या तोंडावर चिकनला महागाईची फोडणी पडली आहे. नववर्षाला ब्रॉयलर कोंबड्यांची जास्त विक्री होते. त्या दिवशी हॉटेलवाल्यांकडून कोंबड्यांना मोठी मागणी असते. मात्र यावर्षी निवडणुकीमुळे मागणी वाढली असल्याचे सांगितले जात आहे.

हिवाळ्यात मटण आणि चिकनला मागणी अधिक असते. उन्हाळ्यात मागणीत घट होते. मात्र आता निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागल्यामुळे यंदा मटण व चिकनची मागणी अचानक वाढली आहे. उन्हाळ्यात मटण व चिकन पचण्यास अधिक गरम असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करीत नाहीत.

- Advertisement -

उन्हाळ्यातच निवडणुकीचा रंग चढल्याने मटण चिकनची मागणी वाढल्याने भाव वधारत आहेत. व्यापार्‍यांना सुगीचे दिवस आलेले असले तरी सामान्य नागरिकांच्या खिशाला मांसाहार परवडत नाही. त्याचबरोबर वाढत्या उष्म्यात अतिमांसाहाराचे सेवन केल्यामुळे शारीरिक त्रासही होऊ शकतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही जरा जपूनच मांसाहार घ्यावा
असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

तेरी भी चुप मेरी भी चुप
गाव वाड्यांवरील मतदारांनाही चिकन मटणाच्या पार्ट्या दिल्या जातात. मात्र त्या छुप्या पध्दतीने होत असल्याने त्याचा गवगवा होत नाही. देणारा आणि खाणारा दोन्ही तेरी भी चुप मेरी भी चुप या पध्दतीने चालत असल्यामुळे कोणाला काहीच कळत नाही. यावर अंकुश ठेवणे आवश्यक असले तरी ते प्रत्यक्षात ते शक्य नसल्याचे राजकीय जाणकारांचे
म्हणणे आहे.

मतदारांची मानसिकता बदलली पाहिजे
मतदारांनीच आपल्यात बदल केला पाहिजे, कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान केले पाहिजे, असे होईल तेव्हाच खर्‍या अर्थाने लोकशाही अस्तित्वात येईल. मात्र आपल्याकडे मतांचा मोबदला दिला घेतला जातो. दारू, पार्ट्या, पैसा, गाडी नाकारून स्वखर्चाने मतदान केंद्रावर जाऊन मतदान ज्या दिवशी मतदार करतील त्या दिवशी
क्रांती नक्कीच होईल आणि देश सुजलाम सुफलाम बनेल – पांडुरंग डांगे, ज्येष्ठ नागरिक.

पोलिसांची करडी नजर
निवडणुकीच्या प्रचारावर पोलिसांची बारीक नजर असली तरी पोलिसांची संख्या पाहता सर्व ठिकाणी पोहचणे त्यांना शक्य नाही. तरीही पोलीस कर्मचारी आपली भूमिका चोख पार पाडत आहेत. तरीही कार्यकर्ते व नेते यांचे वर्चस्व, गावातील गल्लीतील आड भागात पार्ट्यांचे आयोजन होत असते. यामुळे पोलिसांना अशा प्रकारांना आळा घालणे अवघड होत आहे.

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -