घरमहाराष्ट्रपुण्याच्या येरवडा कारागृहातून ५ कैदी फरार

पुण्याच्या येरवडा कारागृहातून ५ कैदी फरार

Subscribe

पुण्याच्या येरवडा कारागृहातून आज पहाटेच्या सुमारास ५ कैदी फरार झाले आहेत. खिडकीचे गज कापून कैद्यांनी पलायन केलं आहे. पाचपैकी तीन कैदी मोक्कातग्रत शिक्षा भोगत होते. देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश अजिनाथ चव्हाण, अक्षय कोंडक्या चव्हाण, अंजिक्य उत्तम कांबळे, सनी टायरन पिंटो अशी फरार झालेल्या कैद्यांची नावं आहेत.

तुरुंग प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. कारागृहाची इमारत क्रमांक चारच्या पहिल्या मजल्यावरील पाचव्या खोलीत हे पाच जण होते. रात्रीच्या सुमारास खोलीच्या खिडकीचे गज कापून ते फरार झाले आहेत. हा प्रकार घडला तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयश जोशी आणि नितिन शिंदे हे रात्रपाळीच्या ड्युटीवर होते. पळून गेलेल्यांपैकी तिघे दौंड तालुक्यातील रहिवासी असून एक हवेली तालुक्याचा तर एक पुण्यातील आहे. त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार दौंड, लोणी-काळभोर आणि वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -