घरमहाराष्ट्रअनिल देशमुखांची ईडीकडे व्हर्च्युअल सुनावणीची मागणी, ईडीच्या तपासावर पत्रातून केले आरोप

अनिल देशमुखांची ईडीकडे व्हर्च्युअल सुनावणीची मागणी, ईडीच्या तपासावर पत्रातून केले आरोप

Subscribe

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीने चौकशीसाठी आज सकाळी ११ वाजता मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, आजही अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार नाहीत. यासंबंधित पत्र त्यांनी वकिलांमार्फत ईडीला दिलं आहे. दरम्यान, या पत्रात त्यांनी ईडीच्या तपासावर आरोप देखील केले आहेत.

अनिल देशमुख यांनी ईडीच्या कार्यालयात चौकशीला जाण्यास नकार देत ईडीला वकिलांमार्फत पत्र दिलं आहे. यामध्ये त्यांनी याआधी ज्या मागण्या केल्या होत्या त्याच मागण्या आता देखील केल्या आहेत. माझी व्हिडिओ, ऑडिओद्वारे चौकशी करा, अशी मागणी पुन्हा एकदा केली. तसंच, मला ECIR ची प्रत द्या किंवा कमीतकमी माझ्याकडून हव्या असलेल्या कागदपत्रांची यादी द्या, अशी देखील मागणी केली आहे. दरम्यान, या पत्रात नवा मुद्दा आहे तो म्हणजे ३ ऑगस्टला म्हणजेच उद्या अंतरिम दिलासा मिळावा यासाठी केलेल्या याचिकेवर सुनावणी आहे. त्यामुळे मी चौकशीला हजर राहू शकत नाही, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांनी त्यांच्या पत्रात ईडीच्या तपासावर आरोप केले आहेत. ईडीकडून केला जाणार तपास हा निष्पक्ष आणि न्याय्य नसल्याचं देशमुखांनी पत्रात म्हटलं आहे.

- Advertisement -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी रुपये वसुल करण्याचा आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुखांवर सीबीआय आणि ईडीने गुन्हा नोंद केला होता. वसुली प्रकरणात ईडीने २५ जूनला अनिल देशमुखांच्या घरी छापेमारी सुरु केली होती. त्यांनतर अनिल देशमुखांचे पीए कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पलांडे यांची ईडीने चौकशी करुन त्यांना अटक केली होती. त्यानंतर अनिल देशमुखांना ईडीने समन्स बजावला होता पण प्रकृतीचे आणि कोरोनाचे कारण सांगून ही चौकशी ऑनलाईन व्हावी अशी मागणी अनिल देशमुखांनी केली होती.

ईडीने देशमुखांविरोधात पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला आहे. ईडीच्या दाव्यानुसार, अनिल देशमुख यांनी राज्याचे गृहमंत्री असताना अप्रामाणिक हेतूने मुंबईतील तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यामार्फत विविध ऑर्केस्ट्रा बार मालकांकडून अंदाजे ४.७० कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. पुढे, दिल्लीस्थित डमी कंपन्यांच्या मदतीने देशमुख परिवाराने ४.१८ कोटींच्या पैशाची उधळपट्टी केली आणि श्री साई शिक्षण संस्थान नावाच्या ट्रस्टमध्ये प्राप्त झालेली रक्कम दाखवून काळा पैसा कायदेशीर केल्याचा अंदाज आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -