घरमहाराष्ट्रलासलगांवमध्ये मिळाली ड्रायपोर्टला मान्यता

लासलगांवमध्ये मिळाली ड्रायपोर्टला मान्यता

Subscribe

नाशिक जिल्ह्यात जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून ड्रायपोर्ट विकसित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मंगळवारी लासलगांव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ईवाय एंटरप्राइजेजच्या प्रज्ञा प्रियदर्शनी आणि ऐश्वर्या मुळे या शिष्टमंडळाने लासलगाव मधून होणारी कांदा, मका,भाजीपाला आणि फळे निर्यातीची माहिती घेऊन चाचपणी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये नाशिक जिल्ह्यात ५०० कोटी रुपये गुंतवणुकीच्या ड्रायपोर्टला मान्यता दिली. सुरुवातीला निफाडमध्ये हा ड्रायपोर्ट होणार होता. मात्र जेएनपीटीच्या माध्यमातून ईवाय एंटरप्राइजेज लासलगांवमध्ये पाहणी करण्यात आली.

दररोज नाशिक जिल्ह्यातून १४ हजार कंटेनर जेएनपीटी मुंबई येथून हे निर्यातीसाठी रवाना करण्यात येतात. कांद्यासाठी आशिया खंडातील प्रथम क्रमांकाची बाजारपेठ म्हणून लासलगांव ओळखले जाते. कांद्याबरोबरच, डाळिंब, टोमेटो, भाजीपाला मका,आणि भुसार मालासाठी लासलगाव अग्रेसर आहे. कांदा, आंबा, डाळी मसाले यासह अनेक पिकांवर विकिरण प्रक्रिया लासलगांव येथील केंद्रामध्ये केली जाते. दरवर्षी लासलगाव मधून ऑस्ट्रेलिया, अमेरिका,युरोप गल्फ कंट्री आदी ठिकाणांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमाल निर्यात केला जातो. लासलगांव शहरामध्ये मध्य रेल्वेची सुविधा असून या रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कांदा पाठविला जातो. त्यामुळे लासलगाव मध्ये जर या ड्रायपोर्टची सुविधा सुरू करण्यात आले तर याचा पिंपळगाव बसवंत, निफाड,चांदवड मनमाड,उमराना,झोडगे, धुळे येथील बाजारसमिति घटकाना फायदा होणार आहे.

- Advertisement -

ड्रायपोर्ट म्हणजे काय
ड्रायपोर्ट हे कृषी मालाच्या निर्यातीसाठी उपयुक्त ठरणारे आहे. ते रेल्वे, रस्ते व सागरी मार्ग जोडण्याचे काम करते. परदेशांतून सागरी मार्गाने येणारा बंदरावर उतरवले जातात. तेथून रेल्वे मार्गाने ज्या शहरात माल पोहोचवायचा आहे तेथे नेला जातो. या पोर्टमध्ये कंटेनरची दुरुस्ती, मालाचा साठा करण्याची सुविधा उपलब्ध असते. जिल्ह्यात कांदा, निर्यातक्षम द्राक्ष आणि डाळिंब उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे भविष्यात त्याचा फायदा होणार आहे. या ड्रायपोर्टमुळे उद्योगांना कमी वेळेत कच्चा माल उपलब्ध करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे वाहतूक खर्च आणि श्रम कमी होवून रोजगार निर्मिती होवू शकते.

कंटेनर वाहतूक
मुंबई येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा विस्तारीत भाग म्हणून हा ड्रायपोर्ट असेल. ड्रायपोर्ट हा समुद्र नसलेल्या विस्तारीत जागेवर उभारण्यात येतो. जहाजातून आयात-निर्यात करणारे मोठ्या कंटेनरमध्ये माल चढविण्यात-उतरविण्यात येतात. ड्रायपोर्टमध्ये कंटेनरमध्ये माल भरण्याविषयीची सेवा मिळेल. या कंटेनरच्या संपूर्ण व्यवस्थापनासह कस्टम क्लिअर येथूनच मिळेल. नाशिक ड्रायपोर्ट ते जेएनपीटी, मुंबई ही कंटेनर वाहतूक स्वतंत्र रेल्वेमार्गाने होऊ शकते.

- Advertisement -

ड्रायपोर्ट हे जमिनीवरील बंदर
समुद्रातील बंदराप्रमाणे याठिकाणी कस्टम क्लिअरन्स, कंटेनर यार्ड, कंटेनर लिफ्टिंग, ट्रक टर्मिनस आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. विविध कंपन्यां मार्फेत नाशिकमधून जेएनपीटी कंटनेरच्या माध्यमातून माल जातो. साधारण एका कंटेनरच्या वाहतुकीसाठी मोठा खर्च येतो. पण लोहमार्गाचा वापर केल्यास हा खर्च निम्यापेक्षा कमी होणार आहे.

ड्रायपोर्टसाठी लासलगाव अनुकूल

– लासलगाव जगात कांदा निर्यातीसाठी अव्वल
-विकिरण केंद्र महाराष्ट्रामध्ये दोनच ठिकाणी लासलगाव आणि वाशी
– रेल्वेचे विस्तृत जाळे
-द्राक्ष,डाळीब,भाजीपाला टॉमेटो, भुसारमालासाठी प्रसिद्ध बाजार पेठ
– रेल्वेच्या माध्यमातून कांदा को स्टोरीज म्हणून लासलगाव ला मान्यता
– वाइन आणि अन्न प्रक्रिया उद्योग साठी प्रसिद्ध असलेली विंचुर औद्योगिक वसाहत अगदी जवळ
– ट्रान्सपोर्ट व्यवस्था उपलब्ध
-रानवड सहकारी साखर कारखाना अगदी जवळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -