घरमहाराष्ट्रआव्हाड- नाईक स्वत:च्या मतदारसंघात अडकले..

आव्हाड- नाईक स्वत:च्या मतदारसंघात अडकले..

Subscribe

एकेकाळी शिवसेनेच्या तोंडातून सत्तेचा घास हिरावून घेतलेल्या राष्ट्रवादीची ठाणे जिल्ह्यातील स्थिती अत्यंत दयनीय झाली असून ज्यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीची प्रमुख मदार आहे ते दिग्गज नेते स्वत:ची आमदारकी यंदा कशी शाबूत ठेवायची या विवंचनेत मतदारसंघातच अडकून पडले आहेत.

गणेश नाईक, वसंत डावखरे, जितेंद्र आव्हाड, कपिल पाटील, प्रमोद हिंदुराव, किसन कथोरे असे एकाहून एक सरस नेते ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे बलस्थान होते. मात्र केंद्रात 2014 मध्ये मोदी सरकार आले, त्यापाठोपाठ राज्यातही सत्तांतर होत भाजप सेना युतीचे सरकार आले. त्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला ठाणे जिल्ह्यात बसला.कपिल पाटील, किसन कथोरे यांच्यांसारखे मोठे नेते वार्‍याची बदलती दिशा बघून भाजपमध्ये डेरेदाखल झालेे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागावरची राष्ट्रवादीची पकड सैल झाली.

- Advertisement -

वसंत डावखरेंसारख्या मातब्बर नेत्याचे निधन झाले आणि राष्ट्रवादीचा गाडा जो काही गाळात रुतला तो अद्याप तसाच आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत निरंजन डावखरेही भाजपात गेले आणि शिवसेना विरोधात लढूनही जिंकूनही आले. त्यामुळे जर स्वत:चे अस्तित्व राखायचे असेल तर भाजपशिवाय तरणोपाय नाही ही भावना तेंव्हापासून राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याच्या मनात आहे.

नवी मुंबईचे सम्राट गणेश नाईक यांनांही मध्यंतरी भाजपकडूनऑफर होत्या अशी चर्चा होती. मात्र आमदार मंदा म्हात्रे तेथे आधीपासूनच असल्याने सत्तेत वाटेकरी होण्याच्या भितीने नाईकांनी तेटाळले. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत नाईकांनी भाजपला स्वत:ची ताकद दाखवूनही दिली. मात्र आता लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर जर कोणाच्या पायाखालची वाळू सरकली असेल तर ती नाईकांच्याच अधिक आहे.

- Advertisement -

कारण त्यांच्या बालेकिल्ल्यातूनही मोदींमुळे शिवसेनेला मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे नवी मुंबईवर स्वत:चे वर्चस्व राखायचे तर एकतर भाजप सेनेशी उघड पंगा घ्या, अथवा मग भाजपात जाऊन भागीदारीत का होईना स्वत:चे वर्चस्व अबाधित राखा हे दोनच पर्याय नाईकांसमोर आहेत. त्यातही पहिल्या पर्यायात जोखीम, धोके अधिक आहेत कारण पंगा घेतल्यानंतर जर विजय मिळाला तर ठीक आहे, मात्र जर पराभव पत्कारावा लागला तर मात्र जे उरले सुरले आहे तेही हातून जायचे अशी द्विधा स्थिती आहे.

राष्ट्रवादीचे दुसरे जिगरबाज नेते म्हणून जितेंद्र आव्हाड ओळखले जातात. पालकमंत्री एकनाथ शिंदेंपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांशी संबंध ठेवून असल्याने आव्हाडांनी कसाबसा मुंब्र्याचा गड अबाधित राखला आहे. मात्र त्यातही आता संघर्ष कमी आणि समन्वय अधिक दिसू लागला आहे. कल्याण लोकसभेसाठी राष्ट्रवादीतून जेंव्हा बाबाजी पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु झाली तेंव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या.

sज्या कल्याणचे आनंद परांजपे हे एकेकाळी खासदार होते , त्यांना तेथून उभे न करता जेंव्हा ठाण्यातून लढण्यास सांगण्यात आले तेंव्हाच ठाणे जिल्ह्यातील नेत्यांमधील समन्वयी पर्व सुरु झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या ठाणे व कल्याण या दोन्ही जागा कशा पडतील यादृष्टीनेच अधिक हालचाली केल्या गेल्यामुळे लोकसभेचा निकाल काय लागणार आहे हे पाहण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना खरेतर 23 मेपर्यंत वाट पाहण्याची काही गरजच नव्हती.

ठाणे जिल्ह्यात विधानसभेच्या 18 जागा आहेत. 2014 मध्ये यातील चार जागा राष्ट्रवादीला जिंकता आल्या होत्या. आता भाजपा सेना युती असल्याने दोन जागा तरी जिंकता येतील की नाही याची शाश्वती कोणी देऊ शकणार नाही. त्यातल्या त्यात आव्हाडांनी मुंब्र्यात 10 हजारांचे मताधिक्क्य राखत थोड्याफार प्रमाणात का होईना आव्हान कायम राखले आहे असे म्हणता येईल. मात्र अन्य तिन्ही जागा युतीने बळकावल्यात जमा आहेत. उल्हासनगरची जागा ही राष्ट्रवादीच्या हातून गेल्यात जमा आहे. शहापुरलाही वेगळी स्थिती नाही. त्यामुळे उरल्या केवळ दोनच जागा एक मुंब्रा, दुसरी ऐरोली( नवी मुंबई). या दोन्ही जागा राखण्यासाठीच राष्ट्रवादीला खरी कसरत करावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -