घरट्रेंडिंगगणेशोत्सवाला अवघा एक महिना शिल्लक; गणेशमूर्तीकारांची राज्य सरकारकडे 'ही' महत्त्वाची मागणी

गणेशोत्सवाला अवघा एक महिना शिल्लक; गणेशमूर्तीकारांची राज्य सरकारकडे ‘ही’ महत्त्वाची मागणी

Subscribe

गणेशोत्सव आता महिन्याभरावर आला असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपासून घरी गणपती बसवणाऱ्या गणेशभक्तांनी तयारीला सुरूवात केली आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही धार्मिक उत्सवांवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सव आता महिन्याभरावर आला असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपासून घरी गणपती बसवणाऱ्या गणेशभक्तांनी तयारीला सुरूवात केली आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही धार्मिक उत्सवांवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एकिकडे गणेश मूर्तीकारांना आनंद झाला आहे, तर दुसरीकडे गणेशोत्सवाला एक महिना शिल्लक असताना निर्णय हटवल्याने यंदा मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती (Ganesh Idols) तयार करणे मूर्तिकारांना (Ganesha Artisans) अशक्य आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि रंगावरील जीएसटी यामुळे मूर्तिकारांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राज्य सरकारने पीओपीवरील जीएसटी उठवावा, अशी मागणी मूर्तिकारांकडून केली जात आहे. (ganesha artisans demands that state government should lift gst on plaster of paris)

मागील सरकारने म्हणजेच महाविकास आघाडी सरकारने कोरोना व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने मोठ्या आकाराच्या मूर्ती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घातली होती. शिवाय, चार फुटापर्यंतच्या मूर्तींना परवानगी दिली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने हा निर्णय रद्द करून निर्बंध हटवले. मात्र, अवघ्या महिन्याभरावर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने मोठ्या आकाराच्या गणेश मूर्ती इतक्या कमी कालावधीत करणे अशक्य असल्याने यंदाच्या गणेशोत्सवात मोठ्या आकाराच्या मूर्ती उपलब्ध होणे अशक्य आहे.

- Advertisement -

“पीओपी आणि रंगावरील जीएसटीमुळे मूर्तिकारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे मूर्तींच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने पीओपी आणि अन्य इतर वस्तूंवरील जीएसटी कर माफ करावा”, अशी मागणी मूर्तिकारांकडून केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकार आता जीएसटी कर माफ करणार का, हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – आतापर्यंत १८ हजार खड्डे बुजवल्याचा महापालिकेचा दावा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -