घरमहाराष्ट्रगणेशोत्‍सव मंडळाना मुख्यमंत्र्यांकडून दिलासा

गणेशोत्‍सव मंडळाना मुख्यमंत्र्यांकडून दिलासा

Subscribe

गणेशोत्‍सव मंडळांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिलासा मिळाला आहे. गणेशोत्‍सव मंडळांना अर्ज करण्‍यात मुदत वाढीचा निर्णय घेण्यात आला असून परवानगीसाठी अर्ज करण्‍याची मुदत ५ सप्‍टेंबरपर्यंत करण्यात आली आहे.

गणेशोत्‍सव मंडळांना मंडपाच्‍या परवानगींचे अर्ज करण्यासाठी २ सप्टेंबर ही मुदत देण्यात आली होती. मात्र या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता मंडपाच्या परवानगीकरता गणेशोत्‍सव मंडळांना ५ सप्टेंबर ही वाढीव मुदत वाढ देण्यात आली. मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या पुढाकाराने गुरुवारी घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे आता गणेशोत्‍सव मंडळांना मुख्यमंत्र्यांकडून दिलासा मिळाला आहे.

गणेशोत्‍सव मंडळांना दिलासा देणारे निर्णय

या बैठकीत महासंघाचे पदाधिकारी, समन्‍वय समिती आणि आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केलेल्‍या मागण्‍यांनुसार अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

  • गणेशोत्‍सव मंडळांना परवानगीसाठी अर्ज करण्‍याची मुदत ५ सप्‍टेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.
  • गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांवरील गणेशोत्‍सव साजरा करण्‍यावरून दाखल करण्‍यात आलेले गुन्‍हे मागे घेण्‍याबाबत गठीत करण्‍यात आलेल्‍या उपसमितीला गुन्‍हे मागे घेण्‍याबात सांगण्‍यात येईल.
  • तसेच यावर्षी अर्ज करताना त्‍यासोबत सादर केलेली कागदपत्रे डिजिटल पध्‍दतीने संग्राहय करण्‍यात येतील त्‍यामुळे मंडळांना पुन्‍हा ही कागदपत्रे दरवर्षी सादर करावी लागणार नाहीत.
  • मंडळांना सध्‍या स्थितीमध्‍ये वेगवेगळया सहा परवानग्या घ्‍याव्‍या लागातात त्‍या एकाच ठिकाणी एकाच अर्जात मिळण्‍याची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात येईल.
  • तसेच ज्‍यांचे परवानगी अर्ज यावर्षी रद्द झाले आहेत त्‍या मंडळांशी चर्चा करून त्‍यांना कायदेशीर मार्गाने परवानगी कशी देता येईल याबाबत चर्चा करून मार्ग काढणार.
  • आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍यासह समन्‍वय समिती आणि महासंघाने बैठकीत केलेल्‍या मागण्‍या ऐकून मंडळांची संख्‍या ही ६ हजार २१२ आहे असा शासकीय आकडा सांगतो तो दुरूस्‍त करायला हवा.
  • गणेशोत्‍सव आगमन आणि विसर्जन मार्गावरील रस्‍त्‍यावरील खड्डे बुजविण्‍यासाठी डेडलाईन देण्‍यात यावी.
  • माऊंट मेरीची जत्रा आणि मोहरमही याच काळात असल्‍याने वाहतुक पोलिसांनी वाहतुकीचे योग्‍य नियोजन करावे. त्‍यासाठी अधिकचे स्‍वयंसेवक आणि गार्ड नियुक्‍त करण्‍यात यावेत.
  • अग्निशमन दल व वाहतुक पोलिसांच्‍या एनओसी विनाविलंब मिळाव्‍यात.
  • तसेच रात्री १२ वाजेपर्यंत लाऊड स्पिकर सुरू ठेवण्‍याची परवानगी गणेशोत्‍सवात केवळ ४ दिवस दिली जाते ती ५ दिवस करण्‍यात यावी.
  • मंडपामध्‍ये लाऊड स्पिकर शिवाय सांस्‍कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम रात्री १० नंतर होणार असतील तर त्‍यांना रोखण्‍यात येऊ नये.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -