घरमहाराष्ट्रतिवरे धरण दुर्घटना : पीडितांना चार महिन्यात घरे बांधून देणार; महाजनांची ग्वाही!

तिवरे धरण दुर्घटना : पीडितांना चार महिन्यात घरे बांधून देणार; महाजनांची ग्वाही!

Subscribe

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर केली.

चिपळूणमधील तिवरे धरण फुटल्याने मोठी जिवितहानी झाली आहे. मंगळवारी मध्यरात्री धरण फुटल्याने त्यात २४ जण बेपत्ता झाले होते. आज दिवसभरात १३ जणांचे मृतदेह सापडले असून अद्याप ११ जण बेपत्ता असल्याचे समजते. त्यांचा एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांकडून शोध सुरू आहे. दरम्यान, आज जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि पालकमंत्री रवींद्र वाईकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह कामथे रुग्णालयाला भेट देऊन या दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली.

वारसांना पाच लाखांची मदत 

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर केली. तसेच चार महिन्यात घरे बांधून देणार असल्याची ग्वाही महाजन यांनी दिली. धरणाची डागडूजी करण्यात आल्याची माहिती यांनी गिरीश महाजन यांनी यावेळी दिली असून दुर्घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आयएएस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

- Advertisement -

शाळेत केली तात्पुरती राहण्याची व्यवस्था

तिवरे येथे धरण फुटून २३ जणांचा मृत्यू झाला ही घटना अतिशय दुर्दैवी घटना आहे. या घटनेची एसआयटीमार्फत चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. ज्यांची घरे वाहून गेली आहेत, त्यांना चार महिन्यांच्या आत घरे बांधून दिली जातील. सोबतच यातील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे, असे गिरीश महाजन म्हणाले. जलसंपदामंत्री महाजन आणि गृहनिर्माण राज्यमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. तत्पूर्वी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांनी नातेवाईकांशी चर्चा केली व माहिती जाणून घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, यामध्ये ज्यांची घरे नष्ट झाली आहेत, अशा सर्वांची व्यवस्था सध्या एका शाळेत करण्यात आली आहे. त्यांना चांगल्या पद्धतीची मजबूत घरे चार महिन्यांच्या आत बांधून देण्याच्या सूचना मी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिल्या आहेत, असे ते म्हणाले.

याबाबत बोलताना जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले की, या धरणातील गळती होत आहे अशी वारंवार तक्रार येत असतानादेखील त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत व संबंधितांवर कारवाई निश्चितपणे केली जाईल. या कार्यात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल हे काल रात्रीपासूनच घटनास्थळावर पोहोचले होते.

- Advertisement -

काय आहे घटना 

रत्नागिरी – चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील किमान सात गावे पाण्याखाली वाहून गेलीया घटनेमध्ये २४ जण बेपत्ता झाले असून ९ जणांचे मृतदेह सापडले आहेतमंगळवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीया घटनेने परिसरात हाहाकार माजला असून किमान २४ ग्रामस्थ वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेसध्या एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -