घरमहाराष्ट्र'ती' अकरा दिवस बहिणीच्या मृतदेहाजवळ बसून राहिली

‘ती’ अकरा दिवस बहिणीच्या मृतदेहाजवळ बसून राहिली

Subscribe

नाशिकच्या भगुर येथील विजयनगर भागातील पंचमोती सोसायटीत एक महिलेचा कुजलेला मृतदेह घरात आढळ्याने एकच खळबळ उडाली आहे. आश्चर्य म्हणजे तिच्या मृतदेहाजवळ तिची बहीण गेल्या अकरा दिवसांपासून बसलेली आढळ्याने उलटसुलट चर्चेला उधान आले आहे. या प्रकाराने भगुर परीसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाजवळ बसलेली मुलगी जादुटोणा किंवा मनोरुग्ण असल्याची उलटसुलट चर्चा सुरु आहे. तीस वर्षांपुर्वी नाशिकरोड येथील डावखर वाडीतील राहणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी मल्लापुरे या आई आणि मुलीच्या मृतदेहा जवळ अशाच प्रकारे बसुन असल्याचा प्रकार उघडकीस आला होता, भगुर येथील या प्रकरणाशी साम्य असल्याचे बोलले जात आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

भगुर गावाच्या पुर्वेला असलेल्या विजयनगर भागातील पंचमोती सोसायटीत सी-७ या रो हाऊसमध्ये गुरुवारी सायंकाळी दुर्गंधी पसरल्याने सोसायटीतील नागरीकांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे आणि गुन्हे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा उघडल्यानंतर प्रचंड दुर्गंधी येत होती. यावेळी सविता दिगंबर बागुल (४२) या महिलेचा मृतदेह आढळुन आला. पोलीसांच्या मते ११ दिवसांपुर्वी सदर महिलेचा मृत्यु झालेला असावा. त्याचबरोबर दोघी बहिणी या मनोरुग्ण असाव्यात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. कारण मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असतांना मृत महिलेची बहिण मिना दिगंबर बागुल (४४) मृतदेहाजवळ बसलेली होती. आईच्या मृत्युनंतर या घरात दोघीच बहिणी कित्येक वर्षांपासुन राहत होत्या. गेल्या दोन महिन्यांपासुन या दोन्ही बहिनींना बाहेर फिरतांना आढळल्या नसल्याचे नागरीकांनी सांगितले. देवळाली कॅम्प पोलीसांनी पंचनामा करुन आकस्मात मृत्युची नोंद केली. मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरांनी घटनास्थळी येऊन शवविच्छेदन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -