घरक्राइमGoa Airport : गोव्यातील मोपा विमानतळावर DRI ची मोठी कारवाई; चार कोटींचे...

Goa Airport : गोव्यातील मोपा विमानतळावर DRI ची मोठी कारवाई; चार कोटींचे सोने जप्त

Subscribe

या कारवाईबाबत डीआरआयने (DRI) सांगितले की, अबू धाबी येथून सोन्याची पेस्ट घेऊन प्रवास करणारे आरोपी मुंबई आणि दुबई दरम्यान कार्यरत असलेल्या सोन्याच्या तस्करीच्या टोळीचा भाग आहेत.

पणजी : ड्रग्जसह सोने तरस्करीचा भांडाफोड करणाऱ्या कारवाया मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, हैदराबाद नंतर आता महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) गोवा विभागाने शनिवारी (21 ऑक्टोबर) रात्री उशिरा सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत सुमारे 4 कोटी रुपये किमतीचे 5.7 किलो सोने आणि iPhone 15 Pro Max चे 28 नग बेकायदेशीरपणे बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक केली. (Goa Airport  DRIs major action at Mopa airport in Goa Four crore gold seized)

या कारवाईबाबत डीआरआयने (DRI) सांगितले की, अबू धाबी येथून सोन्याची पेस्ट घेऊन प्रवास करणारे आरोपी मुंबई आणि दुबई दरम्यान कार्यरत असलेल्या सोन्याच्या तस्करीच्या टोळीचा भाग आहेत. 12 ऑक्टोबर रोजी त्यांनी मुंबई ते अबुधाबी असा प्रवासही केला होता. डीआरआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील इरफान (30), मुंबईचा रहिवासी कामरान अहमद (38) आणि गुजरातमधील मोहम्मद इरफान गुलाम (37) यांना डीआरआयने शुक्रवारी रात्री उत्तर गोव्यात अटक केली.

- Advertisement -

हेही वाचा : अब्दुल सत्तार चले जाओ! गावकऱ्यांनी सत्तारांविरोधात केली घोषणाबाजी, कारण काय?

अंग झडतीत या वस्तू करण्यात आल्या जप्त

DRI च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची अंग झडती घेतली असता तिघांकडून पेस्टच्या स्वरूपात 5.7 किलो सोने आणि 28 आयफोन-15 प्रो मॅक्स मोबाइल फोन जप्त केले, ज्यांची एकूण किंमत 3.92 कोटी रुपये आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिन्ही आरोपी दुबईहून मुंबईत सोने आणि महागड्या वस्तूंची तस्करी करणाऱ्या टोळीचा भाग आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : …त्यामुळे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले, पवारांवरांच्या ‘त्या’ टीकेला भाजपाचे प्रत्युत्तर

याआधी केला होता मुंबई ते अबुधाबी प्रवास

गोव्यातील मोपा विमान तळावर अटक करण्यात आलेल्या आरोपींनी याआधी 12 ऑक्टोबर रोजी मुंबईहून अबुधाबी असा प्रवास केला होता. ते काही दिवस राहून ते पुन्हा त्या वस्तू घेऊन गोवा विमानतळावर परतले, ज्याची ते तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते. अधिकाऱ्याने सांगितले की, आयफोन पॅकेटमध्ये गुंडाळून ठेवले होते, तर सोन्याची पेस्ट दोन प्रवाशांच्या कमरबंदात लपवली होती.

याआधी नागपूर विमानतळावर करण्यात आली कारवाई

याआधी नागपूर विमानतळावर सोने तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. कस्टम विभागाने नागपूर विमानतळावर कतारवरुन आलेल्या दोन जणांना अटक केली होती. आरोपींकडून 87 लाखांचे सोने जप्त करण्यात आले होते. मोहम्मद शाहिद आणि पीरबाबा सौदागर अशी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. हे दोघेही कर्नाटकचे रहिवासी आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -