घरमहाराष्ट्रसरकारने शेतकऱ्यांना १ लाख रुपये मदत द्यावी; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी

सरकारने शेतकऱ्यांना १ लाख रुपये मदत द्यावी; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी

Subscribe

सततच्या नैसर्गिक संकटामुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावे व शेतकऱ्यांना १ लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या नैसर्गिक संकटामुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावे व शेतकऱ्यांना १ लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.  (Government should give Rs 1 lakh to farmers Leader of Opposition Ambadas Danve s demand )

आज नाशिक जिल्ह्यात गारपीटीमुळे नुकसानग्रस्त भागाची दानवे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच मोठं नुकसान झाले आहे, त्यात सरकार ई -पीक पाहणी रिपोर्ट मागत आहे. हे करण्याची जबाबदारी असलेला कृषी विभाग झोपला होता का असा संतप्त सवाल दानवे यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

…नाहीतर शिवसेनेच्या भाषेत उत्तर देऊ

हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नी संवेदनशील नसल्याची टीकादेखील दानवे यांनी केली. नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा झाल्यावर शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे दानवे म्हणाले. अजूनही नियमित कर्जाची रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळत नाही. एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त शेतकऱ्यांवर नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जबरदस्तीने जप्ती आणि वसुली केली जात आहे. सहकार खात्याने हे थांबवावं अन्यथा प्रथम विनंती करून नंतर शिवसेनेच्या भाषेत उत्तर दिलं जाईल, असा इशारा दानवे यांनी दिला.

( हेही वाचा: आयकर विभागाकडून जनतेची ४४ कोटींची लूट? ‘यामुळे’ केला मनसेने हा गंभीर आरोप )

- Advertisement -

सरकारने नुसत्या घोषणा करु नयेत

मुख्यमंत्र्यांनी घोषणा करत रिकाम्या हाताने फिरू नये, तर शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी मदतीचा हात द्यावा, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यावर दिली. शेतकऱ्यांनी आज पाहणी दौऱ्यात मांडलेल्या वेदना व व्यथा ऐकून व्यथित झालो असल्याची खंत दानवे यांनी व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष कांदा उत्पादकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले असताना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे, सरकारने नुसत्या घोषणा करून त्याचा उपयोग नाही तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची गरज असल्याचे दानवे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -