घरताज्या घडामोडी...तह केला असता तर शिवसेना फुटली नसती, गुलाबराव पाटलांची टीका

…तह केला असता तर शिवसेना फुटली नसती, गुलाबराव पाटलांची टीका

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे सरकार कोसळले. शिंदे गटाकडून अद्यापही शिवसेनेला खिंडार पाडण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेना उभारणीसाठी संपूर्ण राज्यभरात शिवसंवाद यात्रेला सुरूवात केली आहे. या यात्रेदरम्यान आदित्य ठाकरेंनी बंडखोरांवर निशाणा साधला. त्यावर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी दौरा केला असावा. त्यांच्या दौऱ्यात टीका केल्याशिवाय दुसरं काम होऊच शकत नाही. हे भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. आदित्य ठाकरे यांनी याकडे त्याच नजरेने बघावं. सर्वात आधी मी पक्षातून फुटलो नव्हतो. शिंदे गटात जाण्यापूर्वी मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

तह केला असता तर…

- Advertisement -

३२ आमदार गेल्यानंतर मी शिंदे गटात सहभागी झालो. मी एकटा नाही तर मी २० आमदार घेऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. मात्र त्यावेळी त्यांनी ज्याप्रमाणे शिवाजी महाराज तह करायचे तसा तह केला असता, तर ही वेळ आली नसती. आदित्य ठाकरे हे तरुण आहेत. त्यावेळी त्यांनी अशाच पद्धतीने राज्यभर दौरे करायला हवे होते, असेही पाटील म्हणाले.

आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र शिवसेना वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आदित्य ठाकरे यांना आवडलेला नाही. त्यामुळेच ते आमच्यावर टीका करत आहेत. परंतु आम्ही गद्दर नाही तर आम्ही खुद्दार आहोत, असे पाटील म्हणाले.


हेही वाचा : ताम्हिणी घाटात कारचा भीषण अपघात, 3 तरुणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -