घरमहाराष्ट्रताम्हिणी घाटात कारचा भीषण अपघात, 3 तरुणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी

ताम्हिणी घाटात कारचा भीषण अपघात, 3 तरुणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी

Subscribe

हे सर्व अपघातग्रस्त तरुण वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील होते. अपघातातील कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे

वाशीममध्ये माणगाव पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात भीषण अपघाताची घटना घडली आहे. स्विफ्च डिझायर कार 100 फूच खोल दरीत कोसळून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीण जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. तीनही जखमींना माणगावमधील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. हे तिन्ही प्रवासी वाशीम जिल्ह्यातील रहिवासी होते.

वाशिम जिल्ह्यातील हे तरुण पर्यटनासाठी कोकणात गेले होते. यावेळी पुन्हा वाशिमला परत असताना माणगाव पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात कारचा अपघात झाला. त्यांची कार 200 फूट खोल दरीत कोसळली. हे सर्व अपघातग्रस्त तरुण वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील होते. अपघातातील कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

- Advertisement -

या अपघातात ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे, कृष्णा राठोड अशी मृत तरुणांची नाव आहेत. तर रोहन गाडे, प्रवीण सरकटे, रोशन चव्हाण अशी जखमी झालेल्या तरुणांची नावं आहे. हे सहा तरुण कोकणात पर्यटनासाठी गेले होते, वाशिमहून तळ कोकणातील देवगडमध्ये फिरायला गेले होते. यावेळीच दुर्दैवी घटना घडली. ताम्हिणी घाटात कार त्यांची पोहचली त्यावेळी एका वळणावर कार कठड्यावरून सुमारे 100 फूट खाली दरीत कोसळली, यावेळी कार दरीच्या मधोमध अडकली होती.


दिल्लीत 24 तासांत 1109 नवीन कोरोना रुग्ण, तर 9 रुग्णांचा मृत्यू

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -