घरदेश-विदेशमोदीजी कुठे येऊ ते सांगा, लूक आऊट नोटीसवर सिसोदिया यांचे प्रत्युत्तर

मोदीजी कुठे येऊ ते सांगा, लूक आऊट नोटीसवर सिसोदिया यांचे प्रत्युत्तर

Subscribe

मनिष सिसोदियांनी लुकआऊट नोटीस जारी होण्याआधी देखील एक ट्विट केले होते. ज्यात त्यांनी पंतप्रधान मोदींचा एक जुना व्हिडीओ पोस्ट केला होता. त्या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी सीबीआयच्या छापेमारीसाठी तत्कालीन यूपीए सरकारवर टीका करताना दिसले

दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षातील ज्येष्ठ नेते मनिष सिसोदिया यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. सिसोदिया यांच्यासह 14 जणांविरोधात सीबीआयने लुट आऊट नोटीस जारी केली आहे. तसेच सिसोदिया यांना देश सोडून जाण्यासही बंदी घातली आहे. लुटआऊट नोटीस आल्याने त्यांना कोणत्याही क्षण अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या लूक आऊट नोटीसवर आता मनिष सिसोदिया यांनी संताप व्यक्त केला आहे. सिसोदिया यांनी ट्विट करत मोदीजी कुठे येऊ ते सांगा असे म्हणत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आव्हान दिले आहे.

अलीकडेच सीबीआयने मद्य घोटाळ्यासंबंधीत शनिवारी तीन आरोपींचा जबाब नोंदवला, त्यानंतर एफआयआर दाखल केला. या एफआयआरमध्ये सिसोदिया यांच्यासह 15 जणांची नावे आहेत. याच प्रकरणात सीबीआयने सिसोदिया यांच्या मालमत्तेवर छापेमारी केली होती.

- Advertisement -

मनिष सिसोदिया यांनी ट्विट करत म्हटले की, ‘तुमच्या सर्व छापेमारी अपयशी ठरल्या, काही मिळालं नाही एका पैशाचा गैरव्यवहार आढळून आला नाही. आता तुम्ही लूक आऊट नोटिस जारी केली आहे. तुम्हाला मनिष सिसोदिया मिळत नाहीये. हे काय नौटंकी सुरु आहे मोदीजी? मी खुले आम दिल्लीतून फिरत आहे. सांगा कुठं यायचं? मी तुम्हाला सापडत नाही?’ अशा शब्दात त्यांनी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आव्हान दिले आहे.

- Advertisement -

मनिष सिसोदियांनी लुकआऊट नोटीस जारी होण्याआधी देखील एक ट्विट केले होते. ज्यात त्यांनी पंतप्रधान मोदींचा एक जुना व्हिडीओ पोस्ट केला होता. त्या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी सीबीआयच्या छापेमारीसाठी तत्कालीन यूपीए सरकारवर टीका करताना दिसले. गुजरातला बदनाम करण्यासाठी सीबीआय छापेमारी करत आहे. सरकार यंत्रणांचा गैरवापर करत आहे. अशी प्रतिक्रिया तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी दिली होती. या व्हिडीओसह मनिष सिसोदियांनी कॅप्शनमध्ये “माना कि धीरे धीरे तो, मौसम भी बदलते रहते हैं, आपकी रफ़्तार से तो, हवाएं भी हैरान हैं साहब.” लिहित खोचक टोला लगावला होता.

दरम्यान सिसोदिया यांनी काल पत्रकार परिषद घेत येत्या एक दोन दिवसात अटक होण्याची शक्यता वर्तवली होती, यावेळी त्यांनी दिल्ली सरकार शिक्षण क्षेत्रात चांगल काम करत आहे, त्यामुळे या कामांना ब्रे लावण्यासाठी केंद्र सरकारचा खटाटोप सुरु आहे. त्यामुळे मला येत्या दोन चार दिवस अटक केली जाऊ शकते, असे सिसोदिया यांनी म्हटले होते, त्यानंतर आज त्यांना लुट आऊट नोटीस जारी करत सिसोदिया यांनी मोठा झटका देण्यात आला आहे.


ताम्हिणी घाटात कारचा भीषण अपघात, 3 तरुणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -