घरमहाराष्ट्ररायगडात 27 टक्के भातशेतीचे नुकसान

रायगडात 27 टक्के भातशेतीचे नुकसान

Subscribe

कृषी विभागाकडून पंचनामे

परतीचा पावसामुळे रायगड जिल्ह्यात भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीत 17 टक्के भातशेेतीचे नुकसान झाले होते. ऑक्टोबर महिन्यातील परतीचा पावसामुळे 10 टक्के नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा सुमारे 27 टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागतर्फे सुरू करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सरासरी 1 लाख 23 हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागडवड करण्यात येते. यंदा 95 हेक्टरवर भातशेतीची लागवड करण्यात आली होती. ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत 16 हजार 395 हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे 17 टक्के क्षेत्रात भातशेतीचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते.

- Advertisement -

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीत वाचलेले पीक चांगले होते. परंतु ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसात ते देखील गेले. परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात अंदाजे 10 हजार हेक्टर क्षेत्रावर कापलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी तसेच ऑक्टोबर महिन्यातील परतीचा पाऊस यामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे 27 टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा रायगड जिल्ह्यात भाताच्या उत्पादनात प्रचंड घट होणार आहे.

परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असले तरी हा पाऊस रब्बी हंगामातील शेतीसाठी लाभदायक ठरणार आहे. जमिनीत ओलावा राहिल्यामुळे वाल व इतर कडधान्याचे उत्पादन चांगले होईल. पांढर्‍या कांद्यासाठीदेखील हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. रब्बी हंगामात कडधान्य लागवडीसाठी महाड विभात 11 हजार किलो तर अलिबाग विभागासाठी 11 हजार किलो कडधान्य बियाणे शेतकर्‍यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी दिली.

- Advertisement -

परतीच्या पावसाने झालेल्या भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल. शेतकर्‍यांना शासन निर्णयानुसार नुकसानभरपाई मिळेल.
– पांडुरंग शेळके, जिल्हा कृषी अधिकारी, रायगड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -