घरमहाराष्ट्रएका ट्रकमध्ये शेकडो मुलं कोंबली, श्वास गुदमरल्याने अनेक विद्यार्थी बेशुद्ध

एका ट्रकमध्ये शेकडो मुलं कोंबली, श्वास गुदमरल्याने अनेक विद्यार्थी बेशुद्ध

Subscribe

गोंदिया – जनावरांना भरतात ज्यापद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांना ट्रकमध्ये कोंबल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे १२० मुलं बेशुद्ध झाली आहेत. गोंदियातील मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील ट्रकमध्ये हा प्रकार घडला आहे. बेशुद्ध झालेल्या विद्यार्थ्यांना एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उफचारांसाठी दाखल कऱण्यात आलंय.

कोयलारी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी घेऊन जात होते. ट्रकमधून हे विद्यार्थी जात होते. खेळून परतत असताना विद्यार्थी कोंबले गेले. त्यामुळे त्यांचा श्वास कोंडला. यातच तब्बल १२० विद्यार्थी बेशुद्ध झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बेशुद्ध झालेल्या विद्यार्थ्यांना एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले तर, एका विद्यार्थिनीला गोंदियाच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जनावरांना कोंबलं जातं तसं या विद्यार्थ्यांना ट्रकमध्ये कोंबण्यात आलं होतं असा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे संबंधितांवर काही कारवाई होतेय का हे पाहावं लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -