घरताज्या घडामोडीते ट्विटर हँडल बोम्मईंचे नाहीच, अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

ते ट्विटर हँडल बोम्मईंचे नाहीच, अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

Subscribe

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेल्या काही दिवसांपासून अधिकच चिघळत चालला आहे. या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेल्या काही दिवसांपासून अधिकच चिघळत चालला आहे. या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत सकारात्कम चर्चा झाल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच, ट्विटरसंदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चाही केल्याची माहिती शिंदेंनी दिली. त्यावेळी ते ट्विटर हँडल माझे नसल्याचे उत्तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिवाय, सर्वांनी मिळून, कुठलेही पक्षीय राजकारण न करता मराठी माणसांच्या पाठीशी उभे रहायला हवे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. (If this not Bommai Twitter handle Leave politics and stand for Marathi people CM Shinde appeal on border issue)

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शिंदे यांनी सांगितले की, “अमित शाह यांनी बोलावलेल्या बैठकीला मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आणि गृहमंत्री उपस्थित होतो. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेला त्रास होऊ नये. मराठी भाषेचा सन्मान व्हावा. मराठी माणसांवर कुठलाही अन्य होऊ नये, अशी भूमिका राज्यसरकारची होती. त्या चर्चेत, गृहमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनीही ते मान्य केले आणि दोन्ही राज्यांत शांततेचे आणि सौहार्दाचे वातावरण रहावे, कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत, अशी सूचना केंद्रिय गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यांना दिल्या आहेत. या वादाच्या प्रश्नावर तीन-तीन मंत्र्यांची समिती तयार होईल”

- Advertisement -

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, “आम्ही जे मुद्दे मांडले आहेत. त्या मुद्द्यांमध्ये मराठी शाळा असतील, मराठी भाषा असेल, मराठी माणसांचे कार्यक्रम असतील, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, अशी भूमिका आम्ही स्पष्टपणे मांडलेली आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे. त्याचा अवमान होऊ नये, याची काळजी दोन्ही राज्यांनी घ्यायला हवी, अशी भूमिका केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली आहे. ते कर्नाटकच्या मुंख्यमंत्र्यांनीही मान्य केली आहे”

कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासोबत काही वक्तव्यांसंदर्भात आणि ट्विट्स संदर्भात चर्चा केली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले. “हे माझे स्टेटमेंट नाही, ते ट्विटर हँडल माझे नाही. आपण असे कुठलेही स्टेटमेंट केलेले नाही. त्यामुळे यात कुणी तरी आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. मराठी माणसांच्या भावनांशी खेळण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. शेवटी सर्वांनी मिळून, कुठलाही पक्षीय राजकारण न करता मराठी माणसांच्या पाठीशी उभे रहायला हवे. त्यांना अधिकात अधिक काय सहकार्य करता येईल, यावर विचार करायला हवा. ही बैठक अतीशय सकारात्मक झाली. यापुढे दोन्ही राज्यांतील नागरीकांना कसलाही त्रास होणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत”

- Advertisement -

हेही वाचा – ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’चा वाद पेटला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -