घरदेश-विदेशतवांग संघर्षानंतर वायुसेनेचा सीमेवर युद्धसराव; सुखोई, राफेल जेटचा 48 तास पॉवर शो

तवांग संघर्षानंतर वायुसेनेचा सीमेवर युद्धसराव; सुखोई, राफेल जेटचा 48 तास पॉवर शो

Subscribe

अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये भारतीय आणि चीन सैन्यात झालेल्या संघर्षानंतर आता भारतीय वायुसेना गुरुवारपासून चीन सीमजवळ दोन दिवसीय युद्धाभ्यास करणार आहे. या युद्धाभ्यासादरम्यान वायुसेनेतील जवळपास सर्वच फ्रंटलाईन फायटर जेट सहभागी होणार आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार, या युद्धाभ्यासामागचा मुख्य उद्देश चीन सीमेवरील आपल्या ऑपरेशन आणि क्षमतांचे परीक्षण करणे हा आहे. भारतीय आणि चीन सैन्यातील संघर्षापूर्वीपासून या सरावाचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे या सरावाचा अलीकडच्या संघर्षाशी काहीही संबंध नाही.

- Advertisement -

हवाई दलाचा हा सराव तेजपूर, चाबुआ, जोरहाट आणि हाशिमारा एअरबसवर होणार आहे. हवाई दलाच्या इस्टर्न कमांडकडून हा सराव करण्यात येणार आहे. ईशान्य भारताला लागून असलेल्या चीन, बांग्लादेश आणि म्यानमारच्या सीमेवर नजर ठेवली जाणार आहे.

सुखोई 30 एमकेआय आणि राफेल फायटर जेटसह भारतीय हवाई दलाची आघाडीची लढाऊ विमाने या सरावात भाग घेतील, अशी माहिती समोर आली आहे. सर्व फ्रंटलाईन एअरबेस आणि ईशान्येकडील काही प्रगत लँडिंग ग्राऊंड्स या सरावात सहभागी होणार आहेत. अरुणाचल आणि सिक्कीममधील वास्तविक नियंत्रण रेषेवर पूर्व लडाखमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लष्कर आणि हवाई दल गेल्या दोन वर्षांपासून उच्च पातळीवर ऑपरेशनल सज्जता राखत आहे.

- Advertisement -

अरुणाचल प्रदेशमथील तवांग सेक्टरच्या LAC वर भारताच्या बाजूने चीनच्या वाढत्या हवाई हालचालींनंतर भारतीय हवाई दलाने गेल्या आठवड्यात आपली लढाऊ विमानं उडवली होती.

तवांग सेक्टरमधील यांगत्से सेक्टरमधील स्थिती एकतर्फी बदलण्याच्या चिनी सैनिकांच्या 9 डिसेंबरच्या प्रयत्नापूर्वी चीनने या भागात ड्रोनसह काही फायटर जेट तैनात केले होते. यावेळी चिनी ड्रोन एलएसीच्या अगदी जवळ आले होते. ज्यामुळे भारतीय वायुसेनेला त्यांचे फायटर जेट उतरावावे लागले यात एकूण लढाऊ क्षमताही वाढवली.

9 डिसेंबर रोजी तवांग सेक्टरमधील यांगत्सेजवळ भारतीय आणि चिनी सैनिकांत झालेल्या चकमकीनंतर भारतीय लष्कराने एक निवेदन जारी केले होते. या चकमकीत दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी झाले होते.


फडणवीसांचा गृहखात्यावर एकहाती कंट्रोल, बदलले मुंबईतील पाचही सहपोलीस आयुक्त

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -