घरठाणेकल्याण तालुक्यात सरपंच पदासाठी १९ तर सदस्य पदासाठी ४० जणांची माघार

कल्याण तालुक्यात सरपंच पदासाठी १९ तर सदस्य पदासाठी ४० जणांची माघार

Subscribe

सरपंच पदासाठी २६ तर सदस्य पदासाठी १०९ सदस्य निवडणुकीच्या रिंगणात

कल्याण : कल्याण तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य पदासाठी निवडणूक होणार असल्याने ग्रामीण भागातील ९ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी ४५ अर्ज तर सदस्य पदासाठी १४९ अर्ज दाखल झाले. बुधवारी सरपंच पदासाठी १९ तर सदस्य पदासाठी ४० जणांनी आपले अर्ज माघार घेतले आहे. यामुळे आता सरपंच पदासाठी २६ तर सदस्य पदासाठी १०९ सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत.

कल्याणतालुक्यातील गेरसे,वेहळे, कुंदे, पळसोली, वसतशेलवली, कोसले, नादंप, काकडपाडा, वासुंद्री या गावात सरपंच, सदस्य पदासाठी निवडणूका होत असल्याने गावात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. १८ डिसेंबरला मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. बुधवारी ७ डिसेंबरला अर्ज माघे घेण्यासाठी वेळ देण्यात आली. गेरसे ग्रामपंचायत एकूण सदस्य पदासाठी आलेल्या अर्जाची संख्या १३, तर सरपंच पदासाठी ५ अर्ज दाखल असून १ माघार, वेहळे ग्रामपंचायत एकुण सरपंचपदासाठी आलेल्या १० अर्जांपैकी ५ अर्ज माघार, तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी आलेले अर्ज १७ पैकी ५ माघार, कुंदे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी १४ अर्जपैंकी २ माघार, सरपंच पदासाठी ५ अर्जांपैकी ३ माघार, पळसोली ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ५ अर्जांपैकी ३ अर्ज माघार, सदस्य पदासाठी १२ अर्जांपैकी ३ माघार घेतली आहे.

- Advertisement -

वसत शेलवली ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ३६ अर्जांपैकी १७ अर्ज माघार, सरपंचपदासाठी ६ अर्जांपैकी ४ माघार, कोसले ग्रामपंचायत सदस्य पदासाठी १० अर्जांपैकी १ अर्ज माघार तर सरपंच पदासाठी ६ अर्जापैकी १ माघार, नादंप सदस्य पदासाठी २३ अर्जांपैकी ७ माघार, तर सरपंच पदासाठी ३ अर्ज, काकडपाडा ग्रामपंचायत सदस्य पदासाठी १२ अर्जांपैकी ५ माघार, सरपंच पदासाठी ३ अर्जांपैकी २ अर्ज माघे, वासुंद्री सदस्यपदासाठी १२ अर्ज तर सरपंच पदासाठी २ अर्ज आले असून एकही अर्ज माघे घेतलेला नाही.

दरम्यान कल्याण तालुक्यातील ९ ग्रामपंचायतिच्या निवडणुकीसाठी बुधवार ७ डिसेंबरला अर्ज माघार घेण्याची मुदत देण्यात आली होती. या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ४५ अर्ज, सदस्य पदासाठी १४९ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी सरपंच पदासाठी १९ अर्ज मागे घेण्यात आले असून सदस्य पदासाठी ४० अर्ज माघे घेतले आहेत. सध्या सरपंच पदासाठी २६ तर सदस्य पदासाठी १०९ सदस्य निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -