घरमहाराष्ट्रआंबा प्रकरण भोवणार! भिडेंचा नोटीस घेण्यास नकार

आंबा प्रकरण भोवणार! भिडेंचा नोटीस घेण्यास नकार

Subscribe

माझ्या बागेतील आंबे खाल्ल्याने १५० जणांना अपत्यलाभ झाल्याचा दावा करणारे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाशिक महापालिकेने नोटीस पाठवली होती. मात्र भिडे यांनी प्रशासनाला न जुमानता नोटीस घेण्यास नकार दिला आहे.

माझ्या बागेतील आंबे खाल्ल्याने १५० जणांना अपत्यलाभ झाल्याचा दावा करणारे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाशिक महापालिकेने नोटीस पाठवली होती. मात्र भिडे यांनी प्रशासनाला न जुमानता नोटीस घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भिडे यांच्यावरील कारवाईसंदर्भात १९ जुलैला नाशिक महापालिकेच्या सल्लागार समितीची तातडीची बैठक घेण्यात येणार आहे. संभाजी भिडे यांनी १० जूनला नाशिक येथील सभेत माझ्या बागेतील आंबे खाल्ल्याने १५० जणांना अपत्यलाभ झाल्याचा दावा केला होता. या भाषणात त्यांनी पीसीपीएनडीटी कायद्याचा भंग केल्याचे आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीला आढळून आले. तसेच राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनीही भिडेंवर कारवाई करण्याची मागणी केल्याने नाशिक महापालिकेने भिडे यांना स्पष्टीकरण देण्यासंदर्भात नोटीस पाठवली होती. ही नोटीस सांगलीतील गावभाग येथील दत्त निवास अपार्टमेंटमधील त्यांच्या राहत्या घरी पाठवण्यात आली होती.

२२ व २३ जूनला ही नोटीस त्यांच्या घरी गेली; परंतु घरातील व्यक्तींनी ती घेण्यास नकार दिला. तसेच २५ जूनला टपाल खात्याकडून भिडे यांना नोटिसीबाबत कळवण्यात आले. परंतु कोणीही नोटीस नेण्यास आले नाही. भिडे यांनी नोटिसीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावरील कारवाईबाबत निर्णय घेण्यासाठी १३ जुलैला नाशिक महापालिकेच्या सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीतील निर्णयानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नाशिक महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी जयराम कोठारी यांनी दिली.

- Advertisement -

संभाजी भिडे यांनी नोटीस न घेतल्याने ती परत कार्यालयात आली आहे. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी पीसीपीएनडीटीच्या सल्लागार समितीची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत वरिष्ठांच्या निर्णयानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
– जयराम कोठारी, वैद्यकीय अधिकारी, नाशिक महापालिका.

कारवाईकडे लक्ष

पीसीपीएनडीटी कायद्यानुसार कारवाई करण्यार्‍या समुचित अधिकार्‍याला जर कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास तो थेट न्यायालयात याचिका दाखल करू शकतो. नाशिक महापालिकेने भिडे यांना पाठवलेल्या नोटिशीमध्ये कायद्याच्या कलम २२ चे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याचे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे आता राज्याचा आरोग्य विभाग व नाशिक महापालिका कोणती कारवाई करणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

भिडे गुरुजींना पाठवण्यात आलेल्या नोटीसीबाबत मी अपडेट नाही, अपडेट होऊन सांगतो.
-तुकाराम मुंढे, नाशिक महानगरपालिका आयुक्त.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -