घरCORONA UPDATECoronaVirus - गेल्या २४ तासात मुंबईत कोरोनाचे २८ रूग्ण, राज्यात रुग्णांची संख्या...

CoronaVirus – गेल्या २४ तासात मुंबईत कोरोनाचे २८ रूग्ण, राज्यात रुग्णांची संख्या ५३७ वर

Subscribe

भारताने कोरोनाला रोखण्यासाठी वेळीच सुरक्षित पाऊलं उचलली आहेत. देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.  तरीही भारतात कोरोनाचा फैलाव वेगाने वाढला आहे. भारतामध्ये गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाची ६०१ नवे रूग्ण समोर आले आहेत. यानंतर आता देशात रुग्णांचा आकडा हा २९०२ वर पोहोचला आहे. तर राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५३७ वर पोहचली आहे. यात मुंबईत सर्वाधिक २८ तर , ठाणे जिल्हा आणि इतर महापालिका क्षेत्र १५ कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. तर  अमरावतीत १, पुणे २ पिंपरी चिंचवडमध्ये १ नवा रूग्ण आढळला आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार, गेल्या २४ तासामध्ये देशात ६०१ नव्या कोरोनाच्या रूग्णांचा आकडा समोर आला असून दर दोन मिनिटाला कोरोनाचा एक नवा रुग्ण या कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. आतापर्यंत भारतात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा २९०२ पर्यंत वाढला आहे. यामध्ये एकूण २६५० सक्रिय प्रकरणं तर १८३ कोरोना रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोना व्हायरसने बळी घेतलेल्यांची संख्या ६८ वर पोहोचली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -