घरमहाराष्ट्रपवारांनी पुस्तकात अदानींचं कौतुक केलं पण शेतकऱ्यांचं नाही, सदाभाऊ खोतांची टीका

पवारांनी पुस्तकात अदानींचं कौतुक केलं पण शेतकऱ्यांचं नाही, सदाभाऊ खोतांची टीका

Subscribe

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यावरून सभागृहातही गोंधळ झाला. विरोधी पक्षांनी यावरून मोदी सरकारलाही घेरले. आता, सदाभाऊ खोत यांनीही या प्रकरणात उडी मारली असून याप्रकऱणी त्यांनी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचा दाखला देत पवारांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, पवारांचे आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात गौतम अदानींचे कौतुक करण्यात आले आहे. असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, पवारांच्या पुस्तकात शेतकऱ्यांचं कौतुक झालं नाही, परंतु अदानींचं करण्यात आले आहे. पवार हे ओसाड गावचे पाटील असून, त्यांच्या बोलण्याला फारसा अर्थ असत नाही. त्यामुळे ते बोलू शकतात. तसेच बोलणं हे जिवंतपणाचं लक्षण असतं अशी बोचरी टीका खोत यांनी केली आहे. खोतांच्या या टीकेला आता राष्ट्रवादीकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

राज्याचा मंत्रिमंडळ अजित पवार यांच्यामुळेच होत नाहीये, असं उपरोधिक वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत केलं. अजित पवार यांचाच मुहूर्त अजून ठरत नाही. शपथविधी कधी घ्यायचा? हे नक्की झालं की मंत्रिमंडळ विस्तार होईल, असंही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -