घरताज्या घडामोडीपर्यावरणाची हानी टाळण्यासाठी एसटीच्या इलेक्ट्रीक शिवनेरी बसचे उद्धाटन

पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी एसटीच्या इलेक्ट्रीक शिवनेरी बसचे उद्धाटन

Subscribe

एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रीक शिवनेरी बसचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. एसटी महामंडळाच्या या तीन इलेक्ट्रीक बस एकूण तीन मार्गावर धावणार आहेत.

एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रीक शिवनेरी बसचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. एसटी महामंडळाच्या या तीन इलेक्ट्रीक बस एकूण तीन मार्गावर धावणार आहेत. पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी या इलेक्ट्रीक बस चालवल्या जाणार आहेत. (Inauguration of Electric Shivneri Bus of ST to prevent environmental damage)

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाच्या एकूण 20 इलेक्ट्रीक शिवनेरी बस सुरू होणार आहेत. या बसेस मुंबईच्या 3 मार्गावर धावणार आहेत. शिवाय, ठाणे स्वारगेट, मुंबई-गोवा आणि मुंबई नागपूर मार्गांवरही या बसेस धावणार आहेत. या बसच्या उद्धाटनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही अंतर प्रवास केला.

- Advertisement -

‘एसटी महामंडळाच्या ईलेक्ट्रीक शिवनेरी बसचे उद्धाटन झाले. 100 ईलेक्ट्रीक शिवनेरी बसेस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. ईलेक्ट्रीक शिवनेरी बसच्या माध्यमातून प्रवाशांना प्रदुषण मुक्त, गारेगार आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे. एसटी महामंडळाचे हे मोठं पाऊल आहे. यानंतर आणखी 5000 इलेक्ट्रीक बसेस एसटी महामंडळाच्या सेवेत दाखल होणार आहेत’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


हेही वाचा – संभाजीराजे छत्रपतींनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; राज्यात नव्या समिकरणांची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -