घरताज्या घडामोडीराज्यात कोरोना रुग्णांमध्ये होतेय वाढ

राज्यात कोरोना रुग्णांमध्ये होतेय वाढ

Subscribe

तिसर्‍या लाटेची शक्यता

कोरोनाचा नवा विषाणू असलेल्या ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. मात्र, राज्यात ओमायक्रॉनबरोबरच कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. मागील आठवड्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 800 ते 900 च्या घरात होती. मात्र, या आठवड्यात तीन हजारांचा टप्पा ओलांडत थेट दीड हजारांची मजल मारली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत 500 ते 600 ने वाढ झाल्याचे दिसून आली. तसेच राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्याही 108 च्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे लवकरच तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यामध्ये निर्बंध कडक करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून आदेश दिले असून, त्याची अंमलबजावणी सरकारकडून करण्यात येत आहेे. वाढत्या ओमायक्रॉनबरोबरच कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. शुक्रवारी राज्यात ओमायक्रॉनचे 20 रुग्ण आढळल्याने राज्यातील रुग्णसंख्या 108 वर पोहोचली आहे. मागील चार दिवसांपासून राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. 21 डिसेंबरला राज्यात 825 रुग्ण तर, 22 डिसेंबरला 1201 रुग्ण, 23 डिसेंबरला 1179 रुग्ण आणि 24 डिसेंबरला 1410 रुग्ण राज्यामध्ये सापडले आहेत. यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये 21 डिसेंबरला 312 रुग्ण, 22 डिसेंबरला 480 रुग्ण, 23 डिसेंबरला 602 आणि 24 डिसेंबरला 673 इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. नाताळच्या पार्श्वभूमीवर वाढती रुग्णसंख्या म्हणजे तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

राज्यात शुक्रवारी ओमायक्रॉनचे २० नवे रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या 108 वर पोहोचली आहे. यातील १४ रुग्णांचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने तर ६ रुग्णांचा अहवाल भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेकडून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पुणे मनपा १, पुणे छावणी बोर्ड ५, मुंबई ११, सातारा २, अहमदनगर १ यांचा समावेश आहे. २० रुग्णांपैकी १५ हे आंतरराष्ट्रीय प्रवासी, १ आंतरदेशीय प्रवासी तर ४ जण त्यांच्या संपर्कातील आहेत. यातील १ जण १८ वर्षांखालील असून, ६ जण ६० वर्षांवरील आहेत. या सर्व रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. तसेच १२ रुग्णांचे पूर्ण लसीकरण झाले असून, ७ रुग्णांचे लसीकरण झाले नाही, तर १ रुग्ण लसीकरणासाठी अपात्र ठरला आहे.

तारीख रुग्ण मृत्यू

21 डिसेंबर – 825 14
22 डिसेंबर – 1201 8
23 डिसेंबर – 1179 17
24 डिसेंबर – 1410 12

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -