घरताज्या घडामोडीशिक्षणमहर्षी पंडित मदनमोहन मालवीय

शिक्षणमहर्षी पंडित मदनमोहन मालवीय

Subscribe

पंडित मदनमोहन मालवीय हे थोर भारतीय नेते व बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1861 रोजी अलाहाबाद येथे गरीब श्रीगौड ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील वज्रनाथ हे व्यासंगी विद्वान होते. वज्रनाथ रामायण-महाभारतातल्या कथा सांगून निर्वाह करीत असल्यामुळे हुशार मदनमोहन यांना इंग्रजी शिकविण्यासाठी-सरकारी शाळेतील फी भरण्यासाठी आईने-मोनादेवीने-आपले दागिने गहाण ठेवले. बी. ए. झाल्यावर (१८८४) स्वतःचे शिक्षण झाले, त्याच सरकारी शाळेत त्यांनी इंग्रजी अतिरिक्त शिक्षकाची नोकरी धरली. मिर्झापूरचे पंडित नंदराम यांची मुलगी कुंदनदेवी हिच्याशी त्यांचा विवाह झाला (१८७८). कॉलेजात असतानाच हिंदू समाज एकसंध करण्यासाठी त्यांनी काही सहकार्‍यांसह एक संस्था काढली (१८८०). तिचे पहिले सार्वजनिक अधिवेशन १८८५ साली भरले. पुढील वर्षी तत्कालीन संयुक्त प्रांताच्या प्रतिनिधी मंडळात स्थान मिळून ते कोलकात्याच्या काँग्रेस अधिवेशनाला गेले. तिथल्या त्यांच्या भाषणाबद्दल सर ह्यूम यांनी त्यांना शाबासकी दिली आणि आयुष्याची दिशा बदलली. १८८८ साली अलाहाबादला काँग्रेस अधिवेशन भरले. त्याच्या स्थायी समितीचे चिटणीसपद मालवीयांना देण्यात आले.

अलाहाबाद काँग्रेस अधिवेशनात मालवीयांनी आपल्या भाषणात मुख्यतः फुटकळ व्यावसायिकांना प्राप्तिकरांपासून सूट देण्यासाठी कराची मर्यादा ५०० रुपयांवरून १,००० रुपयांवर आणावी, असे प्रतिपादन केले. पुढील वर्षी मुंबईला त्यांनी सरकारी खर्चात काटकसर करून गरीब शेतकर्‍यांवरचा करभार हलका करावा, असा आग्रह धरला. १८९० च्या कोलकाता काँग्रेसमध्ये कायदेमंडळाचे अर्धे बिनसरकारी सभासद तरी जनतेने निवडलेले असावेत, अशी मागणी केली. नियुक्त बिनसरकारी सभासदांना जनतेच्या हालअपेष्टांची पर्वा नसते त्यामुळेच मिठावरील कर वाढविण्यास किंवा गरीब शेतकर्‍यांना जाचक ठरणार्‍या पटवारी अकरासारखे कर बसविण्यास त्यांनी संमती दिली, असे त्यांनी दाखवून दिले.
वकिलीची पदवी मिळाल्यावर १८९२ पासून त्यांनी वकिली सुरू केली. सार्वजनिक कार्यात खंड पडू न देता त्यांनी १९०९ पर्यंत वकिली केली. पुढे खिलाफत व असहकार आंदोलन बंद होण्यास कारणीभूत झालेल्या चौरीचौरा प्रकरणी एकूण २२५ जणांना फाशीची शिक्षा फर्मावण्यात आली होता. त्यांचे वकीलपत्र मालवीय यांनी घेतले व त्यांतल्या १५३ लोकांचे प्राण वाचविले.

- Advertisement -

वकिलीबरोबरच ते काँग्रेसच्या कामात लक्ष घालीत. नंतर त्यांनी अलाहाबाद म्युनिसिपल बोर्डातही कार्य सुरू केले. बोर्डाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. १९०२ साली ते संयुक्त प्रांताच्या कायदेमंडळावर गेले. काँग्रेसच्या मवाळ गटाबरोबर राहून त्यांनी संघर्ष टाळून बंगाल फाळणीविरोधी प्रचार व स्वदेशीचा पुरस्कार केला. १९०९ साली ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. काँग्रेसमध्ये असले तरी त्यांनी काँग्रेसच्या अनेक धोरणांना जाहीररीत्या विरोध केला. असहकार आंदोलनाचे वेळी सरकारी व सरकारी अनुदान घेणार्‍या शाळा-कॉलेजांवर बहिष्कार टाकण्यास त्यांनी विरोध केला. खिलाफतीच्या मागणीला पाठिंबा दिला, पण त्यासाठी राष्ट्रीय आंदोलन होऊ शकत नाही, हेही त्यांनी जाहीर केले. अशा या महान समाजसेवकाचे 12 नोव्हेंबर 1946 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -