घरमहाराष्ट्रभारतीय रेल्वेचे १७०व्या वर्षात पदार्पण; सीएसएमटी स्थानकात 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा...

भारतीय रेल्वेचे १७०व्या वर्षात पदार्पण; सीएसएमटी स्थानकात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करणार

Subscribe

भारतातील रेल्वेच्या 'पहिल्या प्रवासा'च्या प्रित्यर्थ, 'आझादी' का अमृत महोत्सव', रेल्वे सप्ताह आणि जागतिक वारसा दिवस (१८.४.२०२२) निमित्ताने, मध्य रेल्वे, युनेस्को हेरिटेज साइट असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या हेरिटेज इमारतीवर एक अनोखा ध्वनी-प्रकाश परफॉर्मन्स शो सादर करणार आहे.

आशियातील आणि भारतातील पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे या मार्गावर शनिवारी १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. मुंबई ते ठाणे मार्गावर धावलेली ही ट्रेन आणि भारतीय रेल्वे यंदा १६ एप्रिल २०२२ रोजी १७०व्या वर्षात पदार्पण करत आहे. भारतातील रेल्वेच्या ‘पहिल्या प्रवासा’च्या प्रित्यर्थ, ‘आझादी’ का अमृत महोत्सव’, रेल्वे सप्ताह आणि जागतिक वारसा दिवस (१८.४.२०२२) निमित्ताने, मध्य रेल्वे, युनेस्को हेरिटेज साइट असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या हेरिटेज इमारतीवर एक अनोखा ध्वनी-प्रकाश परफॉर्मन्स शो सादर करणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही भारतीय रेल्वे आणि संपूर्ण रेल्वे समूहाची शान आहे. या इमारतीचा वारसा आणि वास्तुकला साजरी करण्यासाठी या इमारतीच्या पार्श्वभूमीवर एक अनोखा लाइट आणि साउंड कम परफॉर्मन्स शो आयोजित करीत असल्याचं मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी म्हटलं. सन १९०० मध्ये, इंडियन मिडलँड रेल्वे कंपनी मध्य रेल्वेच्या पूर्ववर्ती ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेमध्ये विलीन झाली आणि तिच्या सीमा उत्तरेला दिल्ली, ईशान्येला कानपूर आणि अलाहाबाद आणि पूर्वेला नागपूर ते दक्षिण-पूर्वेला रायचूरपर्यंत वाढवण्यात आल्या. अशाप्रकारे, मुंबई द्वारे भारताच्या जवळजवळ सर्व भागांशी संपर्क साधला गेला. जीआयपीचे रेल्वेमार्ग १६०० मैल (२५७५ किमी) होते. नोव्हेंबर १९५१ मध्ये निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि ढोलपूर राज्य रेल्वे यांचे एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली.

- Advertisement -

सध्या मध्य रेल्वेवर मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे असे ५ विभाग आहेत. मध्य रेल्वेचे नेटवर्क महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये ४,१८३ मार्ग किमीवर पसरलेले आहे. या आठवडा अखेरीस एक अनोखा लाइट आणि साउंड कम परफॉर्मन्स शो शेड्यूल करण्यात आला आहे.

हा शो ‘नाट्यशास्त्रा’च्या नऊ रसांच्या विविध भावभावनांमधून आपला इतिहास दाखवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारत, रेल्वे आणि देशाच्या इतिहासातील विविध ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित विविध भावनांना उजाळा देणारा हा कार्यक्रम नृत्य, नाटक, संगीत, कविता आणि स्वर सादरीकरणाद्वारे सादर केला जाईल.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज इमारतीतील थीम लाइटिंग सिस्टिमच्या नवीन झगमगाटाचा आनंद घेता येणार आहे. अलिकडच्या काळात आयकॉनिक स्ट्रक्चरला प्रकाश देण्यासाठी वापरल्या जाणार्‍या तंत्रज्ञानात बदल झाला आहे. एलईडी (LED- RGB आणि W) लाइट्सची सुधारित आवृत्ती वापरली जात आहे जी शहराची संस्कृती आणि परंपरा यांची विविधता व्यक्त करेल.

एलईडी (LED) फिटिंग्जचे तंत्रज्ञान ज्यामध्ये दशलक्षाहून अधिक एकत्रित लाइट्सच्या छटा आहेत ते स्टेशनच्या इमारतीला प्रकाश देण्यासाठी वापरले गेले आहेत. १३४ वर्षे जुने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) सुमारे ११०० दिव्यांनी उजळले आहेत. या ११०० पैकी ४५० हून अधिक दिव्यांची चमक कालपरत्वे कमी झाली म्हणून हे सर्व ४५० दिवे नवीन तंत्रज्ञानयुक्त एलईडी दिव्यांसह बदलण्यात आले आहेत.

“नवरसंगम – एक गाथा सीएसएमटी की”, रेल्वे कर्मचारी असलेल्या ७० कलाकारांद्वारे भारतीय सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन केले जाणार आहे. मूळ ऑडिओ ट्रॅकही रेल्वे कलाकारांच्या टीमने तयार केला आहे. दिवे, संगीत निर्मिती आणि स्टुडिओ रेकॉर्डिंग या क्षेत्रांतील कठोर तालीम आणि व्यावसायिक इनपुटनंतर उत्पादन तयार केले गेले आहे. मध्य रेल्वे कल्चरल अकादमीच्या अंतर्गत कलाकार मुख्यालय, विभाग आणि कार्यशाळेतील सर्वसमावेशक सहभागासह सादरीकरण करणार आहेत.


हेही वाचा – दादर स्थानकात 2 एक्स्प्रेस आमने-सामने; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -