घरताज्या घडामोडीमालाड येथील स्पावरील कारवाईत मालकाला अटक, एका महिलेची सुटका

मालाड येथील स्पावरील कारवाईत मालकाला अटक, एका महिलेची सुटका

Subscribe

मालाडमधील स्पावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये मालकाला अटक करण्यात आली आहे. तर एका महिलेची सुटका केली आहे. मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करण्यात आली होती. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर तिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी सापळा रचून मालकाला अटक केली आहे. या कारवाईमध्ये रोख रक्कम आणि काही साहित्य जप्त केले आहे.

मालाड येथील एका स्पावरील कारवाईत स्पाचा मालक अखिलेश जगदीश राय याला मालाड पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी एका महिलेची सुटका केली आहे. याप्रकरणी पिटा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत अटक केलेल्या अखिलेश राय याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत महिलेची मेडीकलनंतर महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. मालाड येथील चिंचोली फाटक रोडवरील लक्ष्मण निवास इमारतीमध्ये युनिट नावाचे एक सलून असून या ठिकाणी काही महिलांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती मालाड पोलिसांना मिळाली होती.

- Advertisement -

या माहितीची शहानिशा करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय लिगाडे यांनी पोलीस पथकाला दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी तिथे एका डमी ग्राहकाला पाठविले होते. या ग्राहकाकडून पोलिसांना सिग्नल प्राप्त होताच या पथकाने संबंधित स्पामध्ये छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी एका महिलेची सुटका केली तर स्पाचा मालक अखिलेश रायला अटक केली. त्याच्याविरुद्ध भादवीसह पिटा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या कारवाईत पोलिसांनी काही कॅशसहीत इतर साहित्य जप्त केले आहेत. पीडित महिलेला नंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.


हेही वाचा : दादर स्थानकात 2 एक्स्प्रेस आमने-सामने; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -