घरताज्या घडामोडीविनित अग्रवाल महाराष्ट्राचे ATS प्रमुख

विनित अग्रवाल महाराष्ट्राचे ATS प्रमुख

Subscribe

ठाण्याला मिळाले नवीन पोलिस आयुक्त

महाराष्ट्रातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या प्रमुख पदावर बदल्या करण्यात आल्या आहेत. आज सोमवारी एकुण तीन आयपीएस अधिकाऱ्यांची ऑर्डर निघाली. त्यामध्ये जयजीत सिंह, संजय सक्सेना आणि विनीत अग्रवाल या तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आहेत. आजच्या आदेशामुळे ठाण्याला जयजीत सिंह यांच्या रूपात नवीन पोलिस आयुक्त मिळाले आहेत. तर विनीत अग्रवाल हे नवीन एटीएस प्रमुख झाले आहेत. तर संजय सक्सेना यांची बदली विनीत अग्रवाल यांच्या जागी करण्यात आली आहे. ठाण्याच्या पोलिस आयुक्तपदी जयजित सिंह यांची नियुक्ती झाल्यामुळे राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी आता विनित अग्रवाल यांची नेमणुक करण्यात आली आहे. विनित अग्रवाल हे १९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

जयजित सिंह यांच्याकडे सध्या अपर पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक ही राज्याची जबाबदारी होती. त्यांची नियुक्ती आता पोलिस आयुक्त ठाणे शहर म्हणून करण्यात आली आहे. तर संजय सक्सेना ज्यांच्याकडे पोलिस महासंचालक विशेष अभियान ही राज्याची जबाबदारी होती, त्यांना आता प्रधान सचिव (विशेष) गृह विभाग, मंत्रालय येथे नियुक्ती देण्यात आली आहे. विनित अग्रवाल हे राज्याचे नवीन अपर पोलिस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक म्हणून जबाबदारी सांभाळतील. जयजीत सिंह हे १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. तर विनीत अग्रवाल हे १९९५ च्या बॅचचे अधिकारी आहेत. तर संजय सक्सेना हे १९९३ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

- Advertisement -

ठाण्याला मिळाला नवीन पोलिस आयुक्त

ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या ४ मे च्या बढतीनंतर गेले तीन आठवडे रिक्त असलेल्या पोलीस आयुक्त पदी अखेर भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधिकारी विद्यमान एटीएस प्रमुख जय जीत सिंह यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. जय जित सिंह यांच्या नियुक्तीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये अखेर समन्वय घडून आल्यामुळे त्यांच्या ठाणे पोलीस आयुक्त पदाच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले आहे. १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले जय जित सिंह यांच्या नियुक्तीचे पत्र आज सोमवारी निघाले.

जय जित सिंग हे भारतीय पोलिस सेवेच्या 1990 च्या बॅचचे आयपीएस आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये जय जीत सिंग यांची नियुक्ती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक पदावरून महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुख पदी करण्यात आली होती. ४ मे रोजी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना महासंचालक पदावर बढती देत त्यांची नियुक्ती महाराष्ट्र पोलिसांच्या गृहनिर्माण मंडळात करण्यात आली. त्यावेळेपासूनच महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख असलेले जयजीत सिंह यांच्या नावाची चर्चा ठाणे पोलीस आयुक्त पदासाठी होत होती. तथापि जय जित सिंह यांच्या नावाबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षांमध्ये एकवाक्यता होत नव्हती. जय जित यांच्या प्रमाणेच ठाणे पोलिस आयुक्त पदासाठी १९८९ च्या बॅचचे संजय कुमार आणि राजेंद्र सिंह यांच्या नावाचीही शिफारस होती. मात्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि ठाण्याचे पालकमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जय जीत सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -