घरमहाराष्ट्रशिवसेनेशी संबंधित दोघांच्या घरी आयटीचे छापे

शिवसेनेशी संबंधित दोघांच्या घरी आयटीचे छापे

Subscribe

निकटवर्तीयांवर धाडसत्र!, एकाच दिवसात झालेल्या छापेमारीमुळे खळबळ

शिवसेनेचे उपनेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तिकर विभागाने धाड मारल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरी प्राप्तिकर विभागाने धाड टाकली. एकाच दिवसात शिवसेनेशी संबंधित दोघांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

प्राप्तिकर विभागाचे एक पथक मंगळवारी सकाळी कनाल यांच्या वांद्रे येथील नाईन अल्मेडा इमारतीतील घरी गेले आणि त्यांनी छापेमारी सुरू केली. यावेळी कनाल यांच्या इमारतीखाली सुरक्षा सीआयएसएफच्या जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. हे धाडसत्र किती दिवस चालेल याची माहिती मिळू शकलेली नाही. तर दुसरीकडे संजय कदम यांच्या अंधेरीच्या कैलास नगरमधील स्वान लेक कैलास या इमारतीतील घरी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले आहेत. अनिल परब यांच्या सीएच्या वांद्रे एमआयजी परिसरातील एलिट इमारतीत आणि पुण्यातील आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावरही प्राप्तिकर विभागाने छापेमारी केल्याची सूत्रांची माहिती आहे.

- Advertisement -

राहुल कनाल हे आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर या दोघांचेही निकटवर्तीय समजले जातात. त्याचसोबत ते शिवसेना पदाधिकारी आणि युवासेनेच्या कोअर टीमचे सदस्य आहेत. श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्तपदही त्यांच्याकडे आहे. मुंबई महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून शिक्षण समितीही त्यांच्याकडे होती. तर अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेले संजय कदम हे शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे संघटक तसेच परब यांचे व्यावसायिक भागीदार आणि पेशाने केबल व्यावसायिक असल्याचेही समजते.
कोट्स

मविआची भाजपला भीती
महाविकास आघाडीची भाजपला भीती वाटायला लागली, तेव्हापासूनच असे सुरू आहे. हे यूपीमध्ये देखील केले. हैद्राबादमध्येही केले. बंगालमध्येही केले. आता महाराष्ट्रात निवडणुका येऊ घातल्या आहेत. म्हणून इथे सुरू आहे.
-आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री

- Advertisement -

हा तर पुरवठा मंत्री
आदित्य ठाकरे यांचा पुरवठा मंत्री असलेल्या राहुल कनाल याचे खरे धंदे काय, हे वांद्रे परिसरात कुणालाही विचारले तरी कळेल. नाईटलाईफ गँगमधला हा प्रमुख, स्वतः हुक्का पार्लर चालवतो आणि त्या माध्यमातून घाणेरडे धंदे करतो.
-नितेश राणे, आमदार, भाजप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -